शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मित्रपक्षांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात ‘भाजप’वर मर्यादा, सध्या एकही आमदार नसल्याचे वास्तव

By समीर देशपांडे | Updated: October 28, 2024 13:13 IST

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दोन ठिकाणी उमेदवारी

समीर देशपांडेकोल्हापूर : देशात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाला कोल्हापूरमध्ये आपली ताकद वाढवण्यावर मर्यादा आल्या आहेत. गेल्या २० वर्षांत शिवसेना आणि जनसुराज्य या मित्रपक्षांमुळे भाजपला अनेक मतदारसंघांमध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करता आलेले नाही. २०१४ साली आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे दोन आमदार निवडून आलेल्या भाजपच्या आमदारांची संख्या २०१९ साली शून्यावर आली हे वास्तव आहे.कोल्हापूर शहर, इचलकरंजी, मलकापूर, आजरा अशी भाजपची ताकद असलेली जिल्ह्यातील काही केंद्रे पहिल्यापासून होती. केवळ छोट्या आंदोलनांच्या माध्यमातून सुभाष वोरा, बाबा देसाई, नाना जरग, बाबूराव कुंभार यांच्यासारख्या अनेकांनी पक्ष जिवंत ठेवला होता. अशातच भाजपआधी कॉंग्रेसला अंगावर घेत शिवसेना जिल्ह्यात प्रवेशकर्ती झाली आणि स्थिरावली. ही किमया भाजपला साधता आली नाही.एकीकडे १९९० पासून शिवसेना अस्तित्व दाखवत असताना, भाजपच्या चिन्हावर १९९९ साली करवीर मतदारसंघातून संग्रामसिंह गायकवाड यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. २००९ साली सुरेश हाळवणकर यांच्या रूपाने जिल्ह्यात पहिल्यांदा इचलकरंजीत कमळ फुलले. त्यावेळी सूर्यकांत पाटील बुदिहाळकर दक्षिणमधून भाजपतर्फे, तर धनंजय महाडिक अपक्ष म्हणून रिंगणात होते.

२०१४ साली भाजपने आपली सर्वोच्च दोन आमदारांची संख्या नोंदवली. हाळवणकर पुन्हा इचलकरंजीतून विजयी झाले, तर अमल महाडिक हे १४ दिवसांत कोल्हापूर दक्षिणमधून आमदार झाले. परंतु, यावेळी कोल्हापूर उत्तरमधून महेश जाधव आणि कागलमधून रिंगणात उतरलेले परशुराम तावरे पराभूत झाले. २०१९ साली हाळवणकर आणि महाडिक दोघेही पराभूत झाले आणि भाजप शून्यावर आला. विधानसभेच्या दहा मतदारसंघांपैकी भाजपला गेल्या १५ वर्षांत केवळ चारच मतदारसंघांत लढण्याची संधी मिळाली आहे.चंदगड, राधानगरी, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ, हातकणंगले हे मतदारसंघ परंपरेने शिवसेना आणि जनसुराज्यकडे असल्याने या ठिकाणी भाजपला फारशी कधीच संधी मिळाली नाही. आता तर शिंदेसेना, जनसुराज्य आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा तीन मित्रपक्षांच्या गर्दीत भाजपच्या कमळावर निवडणूक लढवण्यासाठीच मर्यादा आल्या आहेत. जोपर्यंत सर्वजण स्वतंत्र लढत नाहीत तोपर्यंत भाजपची अशीच स्थिती राहणार आहे.

बळ वाढले पण..भाजप नेते चंद्रकांत पाटील हे २०१४ च्या सरकारमध्ये मातब्बर खात्यांचे मंत्री होते. त्यांनी अनेकांना बळ दिले. परंतु, वाटणीला मतदारसंघच कमी असल्याने युतीच्या विजयासाठीच त्यांची ताकद खर्ची पडली. त्यानंतर धनंजय महाडिक हे राज्यसभेचे खासदार झाले आणि ताकद आणखी वाढली. परंतु, मतदारसंघ तितकेच राहिले. त्यामुळेच आता काही मतदारसंघ खेचण्यासाठी भाजप प्रयत्नशील होता. परंतु, एकीकडे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि दुसरीकडे विनय कोरे त्यांना हलू देत नाहीत, ही सध्याची स्थिती आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणBJPभाजपाMahayutiमहायुती