शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात ६३ अपक्षांचा 'नेम'; कोणाचा होणार 'गेम' ?, आतापर्यंत पाच अपक्षांनी मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 16:27 IST

‘चंदगड’, ‘राधानगरी’मध्ये अपक्ष ठरले डोकेदुखी

कोल्हापूर : विधानसभेच्या १९९९ ते २०२४ पर्यंतच्या निवडणुकीत यंदा सर्वाधिक ६३ अपक्ष नशीब अजमावत आहेत. हे अपक्ष कोणाचे गणित बिघडवणार, हे निकालानंतरच समजणार असले तरी गेल्या पंचवीस वर्षांत जिल्ह्यात केवळ पाच अपक्षांनीच मैदान मारले आहे.विधानसभा निवडणुकीचे मतदान आठवड्यावर आले आहे. प्रचारात चांगलीच रंगत आली असून काही मतदारसंघांत अपक्षांनी पक्षांच्या उमेदवारांच्या नाकात दम आणला आहे. गेल्या पंचवीस वर्षांतील सर्वाधिक ६३ अपक्ष यंदा रिंगणात आहेत. काही ठिकाणी तुल्यबळ अपक्ष नसले तरी ‘चंदगड’, ‘राधानगरी’, ‘हातकणंगले’, ‘इचलकरंजी’ येथे अपक्ष पक्षीय उमेदवारांची डोकेदुखी ठरली आहे. इतर ठिकाणी अपक्ष असले तरी पक्षाच्या उमेदवाराला फारसे मारक ठरतील अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही.पाच अपक्षांनाच संधीविधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत तब्बल तीन अपक्षांना यश मिळाले. ‘शिरोळ’मधून राजू शेट्टी, ‘राधानगरी’तून के. पी. पाटील तर ‘करवीर’ मधून सतेज पाटील हे विजयी झाले होते. त्यानंतरच्या दोन निवडणुकींत कोल्हापूरकरांनी अपक्षांना संधी दिली नाही. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत ‘इचलकरंजी’तून प्रकाश आवाडे तर ‘शिरोळ’मधून राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना यश मिळाले.डिपॉझिट जप्त तरीही निवडणुकीची हौसराजकीय ताकद नसणाऱ्या अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होतात, पण निवडणूक लढवण्याची हौस काही थांबत नाही. काहींना तर विधानसभा, लोकसभा निवडणुकीत अर्ज दाखल करायचाच याची हौस असते.गेल्या पंचवीस वर्षांत असे राहिले अपक्ष रिंगणातनिवडणूक  - अपक्ष उमेदवार१९९९ -  २०२००४ -  २३२००९ - ४७२०१४ - ३९२०१९ - ५२२०२४ - ६३

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkagal-acकागलradhanagari-acराधानगरीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024