शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

शासकीय अधिकारी असल्याचे भासवले, कोल्हापुरात बोगस निवडणूक तपासणी पथकाने २५ लाख लांबविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 15:25 IST

पोलिसांची पाच पथके संशयितांचा शोध घेत आहेत

गांधीनगर/कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शासनाच्या तपासणी पथकांकडून सुरू असलेल्या तपासणीची हुबेहूब नक्कल करून बोगस पथकाने एका व्यावसायिकाची २५ लाख ५० हजारांची रोकड लांबविली. हा प्रकार मंगळवारी (दि. १२) पहाटे पुणे-बंगळुरू महामार्गालगत तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ घडला. याबाबत व्यापारी सुभाष लक्ष्मण हारणे (वय ५०, रा. बागल चौक, शाहूपुरी, कोल्हापूर) यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांची पाच पथके संशयितांचा शोध घेत आहेत.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गांधीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी सुभाष हारणे हे यात्रेत पाळणे लावण्याचा व्यवसाय करतात. ते सोमवारी झालेल्या व्यवसायाची रक्कम घेऊन मंगळवारी पहाटेच्या सुमारास कारमधून तावडे हॉटेल येथे आले. दरम्यान, २५ ते ३० वयोगटातील अज्ञात पाच जणांनी हारणे यांची कार अडवली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू आहे. आमचे अधिकारी तुमच्या कारची झडती घेतील, असे सांगून त्यांनी कारची झडती सुरू केली. त्यावेळी २५ लाख ५० हजार रुपये ठेवलेली बॅग बोगस अधिकाऱ्यांच्या हाती लागली.

आचारसंहिता काळात एवढी रक्कम तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही, असे सांगून त्यांनी कारवाईची भीती घातली. त्यांना आपल्या कारमध्ये बसवून ते सरनोबतवाडीच्या दिशेने गेले. तिथे त्यांच्याकडील रोकड आणि मोबाइल काढून घेऊन पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात हारणे यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली.

बोगस पथकाने खळबळबोगस तपासणी पथकाने व्यावसायिकाची लूट केल्याची माहिती मिळताच पोलिस आणि शासकीय यंत्रणांमध्ये खळबळ उडाली. अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे उपविभागीय अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून गांधीनगरचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांना तपासाच्या सूचना दिल्या. गांधीनगर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पाच पथके तपासासाठी रवाना झाल्याचे जाधव यांनी सांगितले.

महामार्गापलीकडेच अधिकृत पथकनिवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात दीडशेहून अधिक तपासणी पथके कार्यरत आहेत. या ठिकाणी २४ तास अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असतात. तावडे हॉटेल परिसरात शहराच्या प्रवेशद्वारावरच अधिकृत स्थिर तपासणी पथक आहे. तिथून महामार्गाच्या पलीकडेच तोतया पथकाने लूट केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Code of conductआचारसंहिताPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024