शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात तपासणी पथकांकडून १० कोटींचा मुद्देमाल जप्त; रोकड किती.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 14:17 IST

कोल्हापुरात सर्वाधिक मुद्देमाल हस्तगत

कोल्हापूर : आचारसंहिता सुरू झाल्यापासून जिल्ह्यात तपासणी पथकांनी अमली पदार्थ, संशयास्पद वस्तू, बेहिशेबी रोकड, कागदपत्रे उपलब्ध नसलेले दागिने असा १० कोटी ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात सर्वाधिक ५ कोटी ८६ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल पथकांनी जप्त केला. इचलकरंजी मतदारसंघात सर्वांत कमी १० लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल पथकांच्या हाती लागला.निवडणूक काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी दारू, अमली पदार्थ, वस्तू, जेवणावळी, रोकड देण्याचे आमिष दाखवले जाते. यातून आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभाग, जीएसटी विभाग, महसूल, वन विभाग यांच्याकडून जिल्ह्यात एकूण १२८ स्थिर निरीक्षण पथके कार्यरत आहेत. याशिवाय भरारी पथकांकडूनही संशयास्पद वस्तूंवर नजर ठेवली जात आहे. १५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या काळात तपासणी पथकांनी १० कोटी ७१ लाखांचा संशयास्पद मुद्देमाल जप्त केल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.या वस्तू जप्त

  • मौल्यवान दागिने- ७ कोटी ७३ लाख ४२ हजार
  • अवैध दारू-१ कोटी ५० लाख ६२ हजार
  • रोकड- २६ लाख २५ हजार
  • अमली पदार्थ - ९० हजार
  • इतर वस्तू - १ कोटी १९ लाख ८३ हजार

मतदार संघांमधील जप्त मुद्देमाल

  • कोल्हापूर उत्तर - ५ कोटी ८६ लाख ८७ हजार
  • हातकणंगले- २ कोटी ३७ लाख ३९ हजार
  • कोल्हापूर दक्षिण- ६० लाख ४३ हजार
  • कागल - ४४ लाख ४७ हजार
  • करवीर - ३८ लाख ४८ हजार
  • चंदगड - ३१ लाख ४० हजार
  • शिरोळ- ३१ लाख ३ हजार
  • राधानगरी- १६ लाख ८३ हजार
  • शाहूवाडी- १३ लाख ५८ हजार
  • इचलकरंजी- १० लाख ५५ हजार
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरCode of conductआचारसंहिताPoliceपोलिसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024