शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- Gokul Dudh Sangh: संचालक पदाची खिरापत वाटून मते मिळत नाहीत, महादेवराव महाडिकांचा मंत्री मुश्रीफांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:02 IST

मुश्रीफ यांनी बाहेर राहून ‘बिनविरोध’चे प्रयत्न करावेत

कोल्हापूर : मोठा गाजावाजा करत पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारत ‘गोकुळ’ची सत्ता घेतली. चार वर्षांत चांगला कारभार केल्याचा डांगाेरा पिटता तर मग तुम्हाला ‘टाेकन’ देण्याची वेळ का आली, असा सवाल करत मंत्री, आमदारांनी ‘टोकन’चा पाडलेला पायंडा चुकीचा असल्याची टीका माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केली.संचालकपदांची संख्या वाढविण्यामागे दूध उत्पादकांचे हित काय? संचालकपदाची खिरापत वाटून मते मिळत नसल्याचा टोलाही त्यांनी संघाचे व महायुतीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला.महाडिक म्हणाले, कोणत्याही सहकारी संस्थेत विश्वासाने काम केले तर निवडणुकीत प्रलोभनाची गरज नसते. मात्र, ‘गोकुळ’च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘टोकन’ दिले जात आहे. त्यासाठी मंत्री, आमदार हे सुद्धा फिरत आहेत. जिल्ह्यातील दूध उत्पादक स्वाभिमानी आहे, तुम्ही चांगले काम केले तर तुमच्यासोबत तो डोळे झाकून राहतो.राजकीय सोयीसाठी संचालकांची संख्या २५ करणे हे कितपत योग्य आहे. संचालकांचा खर्च वाढणार त्यामध्ये दूध उत्पादकांचा काय फायदा? दूध उत्पादकांच्या घामावर ‘गोकुळ’ मोठा झाला, त्याचे श्रेय कोणी घेऊ नये.मुश्रीफ यांनी बाहेर राहून ‘बिनविरोध’चे प्रयत्न करावेतकेडीसीसी बँकेची निवडणूक वेगळी असते, त्या धर्तीवर कोणी प्रयत्न करणार असल्याचे समजते. त्यासाठी जागा वाढवण्याचा खटाटोप कोण करत असेल तर ते अशक्य आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांना प्रक्रियेत राहून बिनविरोध करता येणे शक्य नाही, त्यांनी बाहेर राहून हे प्रयत्न करावेत, असेही महाडिक यांनी सांगितले.जाजम, घड्याळ खरेदीची निविदा काढली का?हीरकमहोत्सवानिमित्त संघाने दूध संस्थांना जाजम व घड्याळ दिले. साडेचार कोटींची खरेदी करताना निविदा काढली का? एका दिवसात संबंधिताला पैसे दिल्याचा आरोप महाडिक यांनी केला.

महायुती म्हणून सोबत..महायुती म्हणून सगळे एकत्र राहूया, पण प्रत्येक माणसाला स्वत:प्रमाणेच किंमत देत त्याचा मान राखला पाहिजे. त्याचे भानही सगळ्यांनी ठेवले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला.

‘आयकर’ परताव्याचे ३२ कोटी काय झाले?आमच्या काळात आयकर विभागाने ३२ कोटींचा दंड केला होता. त्याविरोधात आम्ही कायदेशीर लढाई सुरू केली होती. ती संघाच्या बाजूने झाली, संबंधित विभागाने संघाला ३२ कोटी रुपये दिले त्याचे काय झाले? गेल्या आर्थिक वर्षात १४२ काेटी ठेवी दाखविल्या वर्षभरात त्या ५१२ कोटींपर्यंत कशा पोहोचल्या? असा सवालही महाडिक यांनी केला.