महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या, कोल्हापुरात भारतीय बौद्ध महासभेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 12:17 IST2025-09-18T12:16:53+5:302025-09-18T12:17:22+5:30
कोल्हापूर : बौद्धस्थळे अतिक्रमणमुक्त करा, महाबोधी महाविहार पूर्ण बौद्धांच्या ताब्यात द्या, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा, ...

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या, कोल्हापुरात भारतीय बौद्ध महासभेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
कोल्हापूर : बौद्धस्थळे अतिक्रमणमुक्त करा, महाबोधी महाविहार पूर्ण बौद्धांच्या ताब्यात द्या, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा, स्वराज्य तालीम मंडळ, आंबेडकरवादी संघटनांतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले.
दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात बौद्धांची धार्मिक स्थळे बौद्धांच्या ताब्यात द्या, सन १९४९चा बुद्धगया मंदिर कायदा रद्द करा, बुद्धगया मनुवाद्यांपासून मुक्त करा, आदी फलक हातात धरून लक्ष वेधण्यात आले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तेथे सामूहिक प्रार्थना करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले, एस. व्ही. ऐणीकर, रेखा बणगे, संतोष भुयेकर, दीपक मांजरेकर, जनार्दन गायकवाड, एस. पी. दीक्षित, तुकाराम कांबळे यांच्यासह बौद्धाचार्य, सैनिक उपासक, भारतीय बौद्ध महासभा आदी सहभागी झाले होते.