शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

मद्रास बटालियन अंतिम फेरीत

By admin | Updated: March 9, 2017 00:52 IST

इंटरबटालियन फुटबॉल स्पर्धा

कोल्हापूर : सदर्न कमांड इंटर बटालियन फुटबॉल स्पर्धेत १२२ इन्फंट्री बटालियन (टीए) संघाने १५४ इन्फंट्री बटालियन (टीए) संघावर ९-१ अशी दणदणीत मात करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. शाहू स्टेडियम येथे बुधवारी १२२ इन्फंट्री बटालियन (टीए)मद्रास विरुद्ध १५४ इन्फंट्री बटालियन (टीए) बिहार संघ यांच्यात उपांत्य फेरीतील पहिला सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून मद्रास संघाचे वर्चस्व राहिले. मद्रासकडून चिकोने ७ व्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर अब्दुल रहिमानने २३ व २६ व्या मिनिटास गोल करत सामना ३-० अशी भक्कम स्थितीत आणला. ३१ व्या मिनिटाला बिहार संघाकडून राजलाल याने गोल करत सामन्यात बरोबरी साधली. पूर्वार्धात सामना ३-१ अशा स्थितीत राहिला. उत्तरार्धात सामन्यात बरोबरी साधण्याच्या इराद्याने बिहार संघ मैदानात दाखल झाला. बिहारकडून मेनव्हॉ, एम्युन्यूल, ब्राईन यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. मात्र, सजग मद्रास संघाच्या बचावफळीने त्यांचे गोल करण्याचे इरादे निष्फळ ठरविले. ५५ व्या मिनिटास मद्रास संघाकडून परमेश के.व्ही. याने गोल नोंदवत ही आघाडी ४-१ अशी केली. त्यात ५८ व्या मिनिटास श्रीजीतने गोल करत ५-१ अशी आघाडी आणखी भक्कम केली. पुन्हा परमेश के.व्ही.ने ६५ व्या मिनिटास गोल करत ६-१ अशी गोलसंख्या नोंदविली. उत्तरोत्तर मद्रास संघाचा खेळ बहरत गेला. ७५ व्या मिनिटास सुमेंशने मैदानी गोल करत त्यात आणखी भर घालत आघाडी ७-१ अशी केली. शेवटच्या काही क्षणांत सामन्यावर मद्रास संघाचेच पूर्ण वर्चस्व राहिले. त्यांच्याकडून शैजूने ८०, तर परमेश के.व्ही.ने वैयक्तिक तिसरा गोल नोंदवत ९-१ अशी भक्कम आघाडी केली. संपूर्ण वेळेत सामना याच गोलसंख्येवर राहिल्याने मद्रास संघाने विजयाबरोबर अंतिम फेरीत स्थान मिळविले.