शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: माधुरी हत्तिणीच्या पुनर्वसनासाठी नांदणीत साकारणार माधुरीवाडा, सहा एकर जागेत उभारणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 12:59 IST

लवकरच बांधकामाला सुरुवात, पश्चिम महाराष्ट्रातील अशा प्रकारचे पहिलेच अत्याधुनिक केंद्र ठरणार

जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाच्या महादेवी ऊर्फ माधुरी हत्तिणीच्या पुनर्वसनासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. मठाच्या सहा एकर जागेत हत्तिणीसाठी सर्व सोयीनियुक्त असा प्रशस्त माधुरीवाडा साकारण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात येथील वनतारा प्रकल्प आणि नांदणी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अशा प्रकारचे पहिलेच अत्याधुनिक केंद्र ठरणार आहे.महाराष्ट्र शासन, वनतारा आणि नांदणी मठ यांच्यात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत माधुरी हत्तिणीच्या प्रकृतीचा आढावा घेऊन या केंद्राला हिरवा कंदील दाखविला होता. दरम्यान, केंद्र उभारण्याच्या पार्श्वभूमीवर परवानगींची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या प्रकल्पासाठी महावितरण, ग्रामपंचायत, पाटबंधारे आणि पशुवैद्यकीय विभागाकडून आवश्यक परवाने प्राप्त झाले आहेत. सध्या केवळ बांधकाम परवाना, प्राणिसंग्रहालय विभागाचा परवाना मिळणे बाकी असून, लवकरच ही प्रक्रियाही पूर्ण होण्याची शक्यता आहे. वनताराचे तज्ज्ञ पथक लवकरच कोल्हापूर दाैऱ्यावर येणार असून, यात माधुरीवाडा प्रकल्पाचे अंतिम डिझाइन निश्चित केले जाणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल.ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगमकोल्हापूर जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी या पुनर्वसन केंद्राची दर्शनी बाजू दगडी बांधकामाची असेल. आतमध्ये मात्र हत्तीच्या आरोग्यासाठी प्रगत तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. यामध्ये हायड्रोथेरेपी सेंटर, हत्ती ट्रॅक व शेड, पर्यटन व शिक्षण, कर्मचारी निवास, पर्यटन गॅलरी, पार्किंग व्यवस्था, देखरेखीसाठी टॉवर गॅलरी, पशुवैद्यकीय पथक यांचा समावेश आहे.पहिलेच केंद्रनांदणी येथे हा प्रकल्प उभारण्यात आल्यानंतर पर्यटनाला चालना मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अशाप्रकारचे पहिलेच अत्याधुनिक हे केंद्र ठरेल. जखमी किंवा आजारी हत्तींना याठिकाणी उपचार मिळतील. माधुरीवाडा हा केवळ निवारा नसून, हत्तींच्या सन्मानाने जगण्याचे आणि त्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्याचे केंद्र असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Madhuriwada: New Rehabilitation Center for Elephant Madhuri Coming Up in Kolhapur

Web Summary : Kolhapur is set to build 'Madhuriwada', a six-acre rehabilitation center for elephant Madhuri, featuring advanced facilities like hydrotherapy. A collaboration between Vanatara and Nandani Math, it's Western Maharashtra's first of its kind.