शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अल्पवयीन मुलीस प्रेमाचे आमिष, फोटो व्हायरल करण्याची भीती घालून ५१ तोळे दागिने लुबाडले

By उद्धव गोडसे | Updated: June 8, 2024 17:29 IST

परराज्यातील संशयिताचा शोध सुरू

कोल्हापूर : सोशल मीडियातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून एडिट केलेले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती घालत बनीदास (पूर्ण नाव, पत्ता उपलब्ध नाही) या संशयिताने ताराबाई पार्कातील अल्पवयीन मुलीकडून ५१ तोळे दागिने लुबाडले. हा प्रकार १९ एप्रिल ते २५ मे दरम्यान घडला. याबाबत संबंधित मुलीच्या वडिलांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, परराज्यातील संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, ताराबाई पार्कातील एका व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवर बनीदास नावाच्या एका तरुणाशी मैत्री झाली. त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर काही दिवसाच त्याने आर्थिक अडचणीत असल्याचे सांगत मुलीकडे पैशांची आणि दागिन्यांची मागणी केली.सासने ग्राऊंड आणि रेसिडेन्सी क्लब येथे भेटून तिच्याकडून दागिने घेतले. तिच्यासोबत काही फोटो काढले. सुरुवातीलाच १५ तोळ्यांचा नेकलेस मिळाल्यानंतर त्याने आणखी दागिने मिळविण्यासाठी तिच्यावर दबाव वाढवला. दागिने न दिल्यास फोटो आणि व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिली.

बदनामीला घाबरून मुलीने वेळोवेळी घरातील २६ लाखांचे दागिने संशयिताला दिले. त्याच्याकडून दागिन्यांची आणि पैशांची मागणी वाढतच गेल्याने अखेर मुलीने घडलेला सर्व प्रकार घरात नातेवाईकांना सांगितला. त्यातून दागिन्यांच्या लुटीचा प्रकार उघडकीस आला. संबंधित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलिसांनी संशयित बनीदास याच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्याच्या शोधासाठी एक पथक परराज्यात रवाना झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस