लव्ह जिहादचे मोर्चे कर्नाटकातील निवडणुकीसाठी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 13:05 IST2022-12-31T13:03:35+5:302022-12-31T13:05:39+5:30

जनेतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हे तथाकथित लव्ह जिहादचे खोटे भूत

Love Jihad marches for Karnataka elections, criticized by Marxist Communist Party | लव्ह जिहादचे मोर्चे कर्नाटकातील निवडणुकीसाठी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची टीका

संग्रहीत फोटो

कोल्हापूर : सध्या कोल्हापूर जिल्ह्यात 'लव्ह जिहाद'चे खोटे कारण पुढे करत भाजपच्या चिथावणीने मोर्चे काढले जात आहेत. जिल्ह्यात किंवा देशात कुठेही लव्ह जिहादचा कार्यक्रम राबवला जात नाही. शेजारच्या कर्नाटक राज्यात निवडणूक जिंकण्यासाठी तेथील भाजपने गेली काही वर्षे मुस्लीमविरोधी कारवाया सुरू ठेवल्या आहेत, अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा शाखेने केली आहे. जिल्हा सचिव प्राचार्य ए. बी. पाटील यांनी त्यासंबंधीचे निवेदन प्रसिध्दीस दिले आहे.

त्यात म्हटले आहे, अलीकडे कर्नाटकातील भाजपने आणि त्याच्या सरकारने महाराष्ट्र विरोधी कारवाया सुरू केल्या आहेत. कोल्हापुरात नुकताच सीमावासीयांच्या हक्कासाठी भव्य मोर्चा काढला. त्या पार्श्वभूमीवर केवळ भाजपच्या कर्नाटकातील धर्मांध प्रचाराला बळ देत मराठी जनेतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हे तथाकथित लव्ह जिहादचे खोटे भूत उभे करण्यात येत आहे. त्यासाठी काढण्यात आलेले मोर्चे कर्नाटकमधील भाजपच्या निवडणूक प्रचारासाठी वातावरण निर्माण करू पाहात आहेत. 
 

Web Title: Love Jihad marches for Karnataka elections, criticized by Marxist Communist Party