शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शेअर मार्केटमध्ये फसला अन् चोरीचा बनाव रचला; देणेकऱ्यांचा तगादा टाळण्यासाठी कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:11 IST

कोल्हापूर : शेअर मार्केटमध्ये झालेले नुकसान आणि उसने पैसे घेतलेल्या मित्रांकडून वसुलीसाठी तगादा सुरू झाल्याने अमीर अब्दुलकादीर इनामदार (वय ...

कोल्हापूर : शेअर मार्केटमध्ये झालेले नुकसान आणि उसने पैसे घेतलेल्या मित्रांकडून वसुलीसाठी तगादा सुरू झाल्याने अमीर अब्दुलकादीर इनामदार (वय २५, रा. आराम कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हापूर) याने चोरीचा बनाव रचला. लक्ष्मीपुरीतील सुसर बागेजवळ लघुशंकेला गेल्यानंतर मोपेडची डिकी उचकटून २ लाख ३८ हजार रुपयांची रोकड अज्ञाताने लंपास केल्याची फिर्याद देण्यासाठी तो लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गेला होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा बनाव उघडकीस आला. गुरुवारी (दि. ३०) दुपारी हा प्रकार घडला.लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास अमीर इनामदार हा तरुण पोलिस ठाण्यात आला. मोठ्याने रडत त्याने त्याची २ लाख ३८ हजारांची रोकड चोरीला गेल्याचे ठाणे अंमलदारांना सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड पथकासह लक्ष्मीपुरीतील सुसर बागेजवळ पोहोचले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक, श्वान पथक आणि ठसेतज्ज्ञही घटनास्थळी पोहोचले.परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यात चोरीचा प्रकार कुठेच दिसला नाही. शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात पोहोचून अमीर इनामदार याच्याकडे चौकशी केली. विसंगत उत्तरांमुळे त्याचा बनाव उघडकीस आला. पोलिसांची दिशाभूल करून खोटी फिर्याद देण्यासाठी आल्याबद्दल पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.शेअर मार्केटमध्ये नुकसानएमबीएची पदवी घेतलेला इनामदार हा गेल्या चार वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत होता. यात त्याला ६७ हजार रुपयांचे नुकसान झाले होते. उपअधीक्षक टिके यांनी त्याचे शेअर मार्केटचे खाते तपासताच बनाव उघडकीस आला. हातउसने घेतलेले पैसे परत देण्यासाठी तगादा वाढत होता. तगादा टाळण्यासाठी चोरीचा बनाव केल्याची कबुली त्याने दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरshare marketशेअर बाजारtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस