वृद्धेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचा हार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 19:36 IST2019-05-15T19:35:17+5:302019-05-15T19:36:22+5:30

आर. के. नगर मोरेवाडी येथील शिवमंदिरात दर्शन घेण्यासाठी जात असताना वृद्धेच्या गळ्यातील ६0 हजार किमतीचा सोन्याचा हार दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केला. सोमवार (दि. १३) मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला.

Lose the neck of the three necklaces in the neck of the elderly | वृद्धेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचा हार लंपास

वृद्धेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचा हार लंपास

ठळक मुद्देवृद्धेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचा हार लंपासआर. के. नगर-मोरेवाडी येथील प्रकार

कोल्हापूर : आर. के. नगर मोरेवाडी येथील शिवमंदिरात दर्शन घेण्यासाठी जात असताना वृद्धेच्या गळ्यातील ६0 हजार किमतीचा सोन्याचा हार दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केला. सोमवार (दि. १३) मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला.

पोलिसांनी सांगितले, राधिका शेखर देसाई (वय ५१) या आई शामलादेवी खराडे यांना घेऊन आर. के. नगर, मोरेवाडी येथे असलेल्या शिवमंदिरात देवदर्शनासाठी चालत जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी खराडे यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांचा सोन्याचा हार हिसडा मारून पोबारा केला.

अचानक घडलेल्या प्रकाराने देसाई व खराडे भयभीत झाल्या. त्यांनी चोर..चोर म्हणून आरडाओरड केली. आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्याकडे धाव घेतली; मात्र चोरटे धूम स्टाईलने पसार झाले होते. काळ्या रंगाच्या पल्सरवरून २२ ते २५ वयोगटांतील तरुण होते.

पाठीमागे बसलेला तरुण सडपातळ, रंगाने गोरा होता. त्यानेच हार हिसडा मारून काढून घेतला. याबाबत देसाई यांनी करवीर पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १४) फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे तपास करीत आहेत.
 

 

Web Title: Lose the neck of the three necklaces in the neck of the elderly