यंत्रमाग कामगारांना जाहीर झालेली मजुरीवाढ मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:00 IST2021-02-05T07:00:26+5:302021-02-05T07:00:26+5:30

फोटो लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांना महागाई भत्त्याप्रमाणे होणारी मजुरीवाढ व उद्योगातील इतर घटकांना दहा टक्के पगारवाढ ...

The loom workers should get the announced wage increase | यंत्रमाग कामगारांना जाहीर झालेली मजुरीवाढ मिळावी

यंत्रमाग कामगारांना जाहीर झालेली मजुरीवाढ मिळावी

फोटो

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांना महागाई भत्त्याप्रमाणे होणारी मजुरीवाढ व उद्योगातील इतर घटकांना दहा टक्के पगारवाढ मिळाली पाहिजे, यासाठीची अंमलबजावणी व्हावी, अशा मागणीचे निवेदन कामगार संघटना संयुक्त कृती समितीने आमदार प्रकाश आवाडे यांना दिले.

निवेदनात, दर सहा महिन्यांनी वाढणाऱ्या महागाई भत्त्याप्रमाणे असे दोन सहामाही महागाई भत्ते एकत्रित करून १ जानेवारीला कामगार आयुक्तांनी त्याची घोषणा जाहीर करावी, असा करार २०१३ च्या मोठ्या आंदोलनानंतर झाला आहे. या करारापासून कोणतेही आंदोलन न करता शहर शांततेत व सुरळीत चालू आहे. परंतु २०१७ पासून महागाई भत्त्याची मजुरीवाढ जाहीर होऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने चार वर्षांपासून वाढलेली मजुरी मिळत नसल्याने कामगार संतप्त झाले आहेत. तसेच २०१३ ला झालेल्या करारातून यंत्रमागधारकांना परस्पर बाहेर पडता येणार नाही, असे म्हटले आहे.

शिष्टमंडळात भरमा कांबळे, मिश्रीलाल जाजू, हणमंत लोहार, मारुती आजगेकर, शिवाजी भोसले, राजू निकम, बंडोपंत सातपुते, राहुल दवडते आदींचा समावेश होता.

(फोटो ओळी) ०१०२२०२१-आयसीएच-०१

इचलकरंजीत यंत्रमाग कामगारांना मजुरीवाढ मिळावी, या मागणीचे निवेदन संयुक्त कृती समितीने आमदार प्रकाश आवाडे यांना दिले.

Web Title: The loom workers should get the announced wage increase