शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसी बळ झुगारत न्यायालयाला कुलूप

By admin | Updated: April 12, 2015 00:46 IST

सर्किट बेंचसाठी आंदोलन : पोलीस-वकीलांत झटापट ; लोक अदालतीच्या कामकाजापासून अलिप्त; वकिल ताब्यात

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन व्हावे, ही मागणी लावून धरत शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीवेळी कोल्हापुरातील वकिलांनी पोलिसांचे बळ झुगारत न्यायालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावले; पण मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावत असताना पोलीस-वकील यांच्यात झटापट झाली. अखेर लक्ष्मीपुरी पोलिसांनी वकिलांना ताब्यात घेतल्यानंतर येथील वातावरण निवळले. यावेळी राष्ट्रीय लोकअदालतीपासून वकील बांधव कामकाजापासून अलिप्त राहिले, तर पक्षकारांनीही या अदालतीकडे पाठ फिरविली. त्यामुळे हे आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा वकिलांनी केला. कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सातारा व सांगली या सहा जिल्ह्णांसाठी उच्च न्यायालयाचे प्रथम सर्किट बेंच व त्यानंतर खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी दोन दशकांहून काळ अधिक वकिलांचे आंदोलन सुरू आहे. शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीवेळी टाउन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात सकाळपासून वकील जमू लागले. यावेळी काही तुरळक पक्षकार येथे आले असता त्यांना लोकअदालतीला जाऊ नका, अशी विनंती वकिलांनी केली. त्याला पक्षकारांनी साथ देत अदालतीकडे पाठ फिरवली. त्यानंतर सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास वकिलांनी दुसऱ्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. यानंतर सर्व वकील मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले. यावेळी अ‍ॅड. राजेंद्र किंकर यांनी, सर्किट बेंचप्रश्नी भूमिका सर्वांसमोर विशद केली. त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यासाठी मोर्चा वळविला. यावेळी उपाध्यक्ष अ‍ॅड.के.व्ही. पाटील म्हणाले, आजच्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सुमारे ३५ हजार खटले ठेवण्यात आले आहेत. सर्किट बेंच मागणीसाठी शुक्रवारी (दि. १७) मुंबई येथील आझाद मैदानावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आहे. यावेळी प्रवेशद्वाराजवळ आडवे राहून पोलिसांनी कुलूप लावण्यास विरोध दर्शविला. त्यावेळी पोलीस-वकील यांच्यात झटापट झाली. वकील आक्रमक झाल्याने शेवटी पोलिसांनी सर्व वकिलांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसविले व पोलीस ठाण्यात नेले. आंदोलनात सेक्रेटरी अ‍ॅड. राजेंद्र मंडलिक, अ‍ॅड. अजित मोहिते, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अ‍ॅड. बी. आर. पाटील, अ‍ॅड. राजेंद्र किंकर, अ‍ॅड. एम. जी. पाटील, अ‍ॅड. रवी जानकर, अ‍ॅड. अमोल पाटील, अ‍ॅड. समीर पाटील, अ‍ॅड. राहुल शेळके, अ‍ॅड. पूजा कटके, अ‍ॅड. चारूलता चव्हाण, अ‍ॅड. सुशीला कदम, अ‍ॅड. बाबासाहेब पाटील, अ‍ॅड. जगदीश आडनाईक, अ‍ॅड. बी. एम. शास्त्री, अ‍ॅड. राजेंद्र पाटील, अ‍ॅड. अनिल पाटील, अ‍ॅड. व्ही. आर. पाटील, अ‍ॅड. योगेश साळोखे, अ‍ॅड. आनंदराव पाटील, आदी उपस्थित होते. कुलूप काढले तोडून जिल्हा व सत्र न्यायालयाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराला लावलेले कुलूप पोलिसांनी आंदोलनानंतर दगडाने फोडून काढून प्रवेशद्वार उघडे केले. मुख्य जिल्हा न्यायाधीश एन. जे. जमादार यांच्यासमोर हे कुलूप पोलिसांनी काढले. यावेळी जमादार यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. संघटनांनी फिरवली पाठ शहरात अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना प्रत्येक वेळी वकिलांच्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दर्शवितात; पण शनिवारी झालेल्या वकिलांच्या आंदोलनावेळी बहुतांश स्वयंसेवी संस्था, संघटना यांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसत होते. इचलकरंजीतही बहिष्कार इचलकरंजी : इचलकरंजी येथे न्यायालयातील विविध दावे तडजोडीने निकाली काढण्यासाठी झालेल्या लोक अदालतीमध्ये हातकणंगले तालुक्यातील १४ दावे निकाली निघाले. या अदालतीमध्ये एकूण १०८ दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. लोक अदालतीमुळे दावे कमी होण्यास मदत होत असल्याचे तहसीलदार दीपक शिंदे यांनी सांगितले. या लोक अदालतीवर वकिलांनी बहिष्कार टाकला होता.