शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील स्थानिक व्यावसायिकांना कोट्यवधींचा गंडा, उचल घेऊन उत्तर प्रदेशचा बबलू खान झाला पसार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 17:03 IST

जागा घेऊन तीनमजली इमारत उभी केली. यावर त्याने एका पतसंस्थेचे मोठे कर्ज उचलले

शिरोली : स्क्रॅप व्यवसायात परतावा जादा देण्याच्या अटीवर तीन कोटींहून अधिक उचल घेऊन उत्तर प्रदेशचा बबलू खान पसार झाल्याने स्थानिक व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत फसवणूक झालेल्या २० हून अधिक जणांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी खान आपल्या कुटुंबीयांसमवेत घराला कुलूप लावून गायब झाला. त्याचा मोबाइलही बंद असल्याने फसवणूक झालेल्या व्यावसायिकांनी थेट शिरोली एमआयडीसी पोलिसांत धाव घेतली.बबलू खान हा मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. काही वर्षांपूर्वी कामानिमित्त तो शिरोलीत आला. काही स्थानिकांच्या मदतीने तो स्क्रॅप व्यवसायात आला. त्याची कामाची पद्धत, स्क्रॅपची देवाणघेवाण स्थानिक व्यावसायिकांना भुरळ घालणारी होती. त्यामुळे अनेक जणांनी त्याच्याशी सलगी करत आर्थिक गुंतवणूक सुरू केली. सुरुवातीच्या टप्प्यात खानने आर्थिक व्यवहार चांगला सांभाळला. यातून त्याने शिरोली येथे जागा घेऊन तीनमजली इमारत उभी केली. या इमारतीवर त्याने एका पतसंस्थेचे मोठे कर्ज उचलले आहे. हे कर्जही आता थकबाकीत आहे. काही व्यावसायिकांनी खानशी मैत्री करून मोठी उलाढाल करत स्वतःचा फायदा करून घेतला आहे; पण खानच्या अचानक गायब होण्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. त्याचा शोध घेऊन वसुली होईलच, याची शाश्वती नाही. त्यामुळे पुढे काय, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.पोलिस या सर्व प्रकरणाची दोन्ही बाजूने चौकशी करणार असल्याने लवकरच सत्य समोर येईल, अशी अपेक्षा आहे. याबाबत तपासणी पोलिस अधिकारी यांना विचारले असता तपास सुरू आहे, अर्जदारांनी नमूद केलेल्या रकमेबाबत खातरजमा केली जात आहे. त्यानंतर रितसर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस