शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीत आजपासून साहित्य संमेलन

By admin | Updated: December 19, 2014 00:56 IST

‘माता रमाई’ साहित्यनगरी : अरूणा ढेरे, नितीन देसाई, सुबोध भावे उपस्थित राहणार

शिवाजी गोरे -दापोली महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या २३व्या विभागीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्या (दि. १९) कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या हस्ते दापोलीत होणार आहे. प्रख्यात साहित्यिक डॉ. अरूणा ढेरे या संमेलनाच्या अध्यक्ष असून, उद्घाटन कार्यक्रमाला वन व पर्यावरणमंत्री रामदास कदम उपस्थित राहणार आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात शुक्रवारी सकाळी ११ वाजता या संमेलनाचे उद्घाटन होणार असून, दोन दिवस भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी निघणाऱ्या साहित्यदिंडी व चित्ररथामध्ये अभिनेता सुबोध भावे, शर्वरी जमेनिस, गायक प्रथमेश लघाटे, शमिका भिडे सहभागी होणार आहेत. या संमेलनाचे यजमानपद असलेल्या मसापच्या दापोली शाखेकडून यानिमित्त उद्योजक, साहित्यिक, पत्रकार, सहकारतज्ज्ञ आदींचा विशेष पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी पितांबरी उद्योग समुहाचे रवींद्र प्रभूदेसाई, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, ज्येष्ठ कला दिग्दर्शक चंद्रशेखर बगाडे, सुहासिनी गायकवाड आदी मान्यवरांचा विशेष गौरव होणार आहे, तर समारोपाच्या दिवशी जिल्ह्यातील पहिल्या दैनिकाच्या संपादिका धनश्री पालांडे, उद्योजक रघुनाथ महाडिक, प्रा. शांताबाई सहस्रबुद्धे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे.संमेलनाच्या पहिल्या दिवशी ‘साहित्यात कोकणचे योगदान व सद्यस्थिती’ या विषयावरील परिसंवाद, प्रख्यात गीतकार-अभिनेते किशोर कदम यांची मुलाखत, निमंत्रितांचे काव्यसंमेलन होणार आहे. सायंकाळच्या सत्रात विसुभाऊ बापट यांचा कुटुंब रंगलय काव्यात हा प्रयोग तसेच नंदेश उमप आणि युवराज मोहिते यांचा ‘आमचा बाप आणि आम्ही’ हा कार्यक्रम होणार आहे.शनिवारी बदलती माध्यमे आणि त्यातील वाचक, प्रेक्षक व श्रोत्यांचे स्थान या विषयावर परिसंवाद होणार आहे. प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांची मुलाखत, दीपक देशपांडे यांचा ‘हास्यकल्लोळ’ हे कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळच्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन, समारोपात मान्यवरांचा सत्कार होणार आहे. भीमराव पांचाळे यांच्या गझल गायनाने संमेलनाची सांगता होणार आहे. (प्रतिनिधी)