शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गुजरातला निघालेली १ कोटीची दारु पकडली, अणुस्कुराजवळ भरारी पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 11:59 IST

आठवड्यात दुसरी मोठी कारवाई

कोल्हापूर : गोव्यातून अणुस्कुरा घाटमार्गे ट्रकमधून आणलेली एक कोटी १५ लाख २० हजारांची बनावट दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी (दि. २१) सकाळी अणुस्कुरा (ता. शाहूवाडी) गावाजवळ पकडली. ट्रकचालक रामजीवन वीरधाराम बिष्णोई (वय २६, रा. बाडमेर, राजस्थान) याला अटक केली.

गोव्यातून खरेदी केलेली दारू मलकापूर, कराडमार्गे पुढे गुजरातला घेऊन जाणार होतो, अशी कबुली त्याने उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दिली. एकाच आठवड्यात ही दुसरी मोठी कारवाई झाली.राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बनावट दारूची तस्करी वाढली आहे. याला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची संशयास्पद वाहनांवर नजर आहे. अणुस्कुरा घाटमार्गे बनावट दारू जिल्ह्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर येथील भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक सदानंद मस्करे यांच्या पथकाची अणुस्कुरा घाटातील वाहनांवर नजर होती. बुधवारी सकाळी त्यांनी अणुस्कुरा गावाजवळ एक संशयित ट्रक अडवून झडती घेतली असता त्यात एक कोटी १५ लाख २० हजार रुपये किमतीचा गोव्यात तयार केलेला बनावट दारूचा साठा आढळला. दारूच्या बाटल्यांचे १६० बॉक्स आणि १५ लाख ३० हजार रुपये किमतीचा ट्रक पथकाने जप्त केला.पथकाने ट्रकचालक बिष्णोई याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याने गोव्यातून कोणाकडून दारूची खरेदी केली आणि गुजरातमध्ये कोणाला पोहोचवणार होता, याचा तपास सुरू असल्याचे अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी सांगितले. निरीक्षक मस्करे यांच्यासह दुय्यम निरीक्षक अभयकुमार साबळे, अजय वाघमारे, सहायक दुय्यम निरीक्षक कांचन सरगर, जवान विलास पवार, सचिन लोंढे, विशाल भोई, आदींच्या पथकाने कारवाई केली.बनावट दारूपथकाने जप्त केलेली दारू गोव्यात तयार झाली असून, ती बनावट आहे. बाटलीच्या लेबलवर बॅच नंबर नाही. तयार करणाऱ्या उत्पादकाची माहिती नाही. उत्पादन कधी केले याचा तपशील नाही. त्यामुळे ही बनावट दारू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

आठवड्यात दुसरी मोठी कारवाईराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी (दि. १८) देवगड-निपाणी मार्गावर आणूर रोड येथे पकडलेल्या ट्रकमधून ४० लाखांची बनावट दारू जप्त केली होती. महाराष्ट्राचे लेबल लावलेली ती दारू नागपूरला पोहोचवली जाणार होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Crores Worth Liquor Seized En Route to Gujarat

Web Summary : Kolhapur excise officials seized ₹1.15 crore worth of illicit liquor near Anuskura, arresting the truck driver. The liquor, originating from Goa, was destined for Gujarat. This is the second major seizure this week, highlighting increased vigilance during local elections.