liquor seized in kolhapur | प्लास्टिक बाटल्यांच्या खाली लपविलेला विदेशी मद्याचा साठा जप्त
प्लास्टिक बाटल्यांच्या खाली लपविलेला विदेशी मद्याचा साठा जप्त

ठळक मुद्देफोंडा ते राधानगरी मार्गावर न्यु करंजे येथे विदेशी मद्याची वाहतूक करणारी हौदा पिकअप जीप राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडली.पाच लाखांचा विदेशी मद्यसाठा प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांच्या ढिगाऱ्याखाली सापडला. मद्यासह वाहन असा सुमारे ७ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कोल्हापूर - फोंडा ते राधानगरी मार्गावर न्यु करंजे येथे विदेशी मद्याची वाहतूक करणारी हौदा पिकअप जीप राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी पहाटे पकडली. यावेळी पाच लाखांचा विदेशी मद्यसाठा प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांच्या ढिगाऱ्याखाली सापडला. मद्यासह वाहन असा सुमारे ७ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी संशयित राजन नारायण नाईक (वय ४०, रा. सावंतवाडी, खासकीलवाडा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदूर्ग), शिवराम विश्वनाथ हळदणकर (३०, रा. चराटा, शिल्पग्राम, सावंतवाडी) यांना अटक केली. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक गणेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 भरारी पथकास फोंडा ते राधानगरी मार्गावरुन काही लोक बेकायदा गोवा बनावट मद्याची वाहतूक करणार असलेची माहिती मिळाली आहे. त्यानुसार या मार्गावर ठिकठिकाणी पथके तैनात करुन पाळत ठेवली. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास न्यु करंजे (ता. राधानगरी) गावच्या हद्दीत पिकअप वाहन येत असल्याचे दिसले. त्याला थांबूवन चालक राजन नाईक याचेकडे चौकशी केली असता रिकाम्या प्लास्टीक बाटल्या भरलेल्या गोण्या असल्याचे सांगितले. गोपनीय माहितीनुसार, वाहन हेच असलेची खात्री झाल्याने तपासणी केली असता बाटल्यांच्या गोण्याखाली लपविलेले मद्याचे बॉक्स मिळून आला. मद्यसाठा कोणाला देणार होते. कोठून खरेदी केला, याबाबत चौकशी सुरू असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. ही कारवाई निरीक्षक संभाजी बरगे, जगन्नाथ पाटील, किशोर नडे, जवान संदीप जानकर, सागर शिंदे, सचिन काळे, जय शिनगारे, रंजना पिसे यांनी केली आहे. 

 

Web Title: liquor seized in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.