शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

‘देशी’च्या माध्यमातून जगण्याच्या संघर्षावर प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 01:20 IST

पुरस्कारासाठी ३५ लघुपटांची शॉर्टलिस्ट करण्यात आली होती. त्या हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलावंतांचेही लघुपट होते. त्यातून ‘देशी’ला मिळालेला हा सन्मान आमच्या टीमचा उत्साह दुणावणारा आहे.

इंदुमती गणेश ।कोल्हापूर म्हणजे चित्रपटसृष्टीचे माहेरघर. कोल्हापुरातील वडणगे या गावातील रोहित कांबळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘देशी’ या लघुपटाला फिल्मफेअरचा प्रेक्षक पसंती पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्ताने कोल्हापूरच्या मातीत रुजलेला चित्रपट संस्कार आणि सर्वसामान्य तरुणांमधील कौशल्यपूर्ण निर्मितीवर पुन्हा एक मोहोर उमटली... या पुरस्काराचे औचित्य साधून रोहित कांबळे यांची घेतलेली ही चर्चेतील मुलाखत..

प्रश्न : अत्यंत खडतर परिस्थितीत लघुपट या क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली?उत्तर : मी मूळचा कागलचा; पण शिक्षणासाठी आई काम करीत होती, त्या कुशिरे येथील आश्रमशाळेत प्राथमिक शिक्षण घेतलो. वडील गवंडी काम करायचे. मी, भाऊ, बहीण असं कुटुंब. घरची परिस्थिती अतिशय बेताची; झोपडीवजा घरात राहायचो. पण शिक्षणाची आवड होती. शिकण्याची प्रेरणा आईनेच दिली. आठवी दरम्यान शिक्षक मिलिंद यादव यांचा सहवास लाभला आणि त्यांनी माझ्या हातात पहिल्यांदा कॅमेरा दिला. तेव्हापासून फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. हेच माझ्या उदरनिर्वाहाचे साधनही झाले. यातूनच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. पुढे शिवाजी विद्यापीठात पत्रकारितेची पदवी घेतली. ‘नेट’ झालो... आणि तिथून माझा डॉक्युमेंटरीच्या दिशेने प्रवास सुरू झाला.

प्रश्न : लघुपट निर्मितीला सुरुवात कशी झाली?उत्तर : सुरुवातीला मी अ‍ॅबस्ट्रॅक पद्धतीने दीड, दोन मिनिटांचे लघुपट बनवू लागलो. त्यानंतर व्हु ईज पोल्युटर या लघुपटाला वसुंधरा फि ल्म फेस्टिव्हलमध्ये प्रथम बक्षीस मिळाले. त्यानंतर राज्य शासनातर्फे आयोजित ‘महाराष्ट्र माझा शेतकरी राजा’ या अंतर्गत घेण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत शासनाची कल्पना या विषयावरील लघुपटाला दुसरा क्रमांक मिळाला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान मिळाला. त्यामुळे आत्मविश्वास वाढला.

प्रश्न : देशी लघुपटाबद्दल काय सांगशील?उत्तर : मला कायम वाटायचं की जात-धर्माशिवाय माणूस जगू शकत नाही का? मग या विचारातून ‘देशी’ची कथा सुचली. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या मुलीला शाळेत प्रवेश घेताना येणाºया अडचणी आम्ही या २० मिनिटांच्या लघुपटात मांडल्या आहेत. त्याचे चित्रीकरण कोल्हापूर आणि पन्हाळ््यात झाले आहे. चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळ प्रस्तुत आणि राजेंद्रकुमार मोरे यांनी याची निर्मिती केली. लेखन, दिग्दर्शन माझे आहे.

कलात्मक निर्मितीची जाणीवआपण अधिक दर्जेदार, कलात्मक चित्रपटांची निर्मिती केली पाहिजे, याची जाणीव झाली आहे. आता नागरिकांच्याही आमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. ते पूर्ण करताना कोल्हापूरला लाभलेला मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ परत आणण्यासाठी प़्रयत्न करायचा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcinemaसिनेमा