शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Kolhapur Crime: अपहरण करून चिमुरड्या वरदचा खून, आरोपीस आजन्म कारावास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 17:31 IST

अनिल पाटील मुरगूड : सोनाळी ता.कागल येथील वरद रवींद्र पाटील (वय ७) या बालकाचा अपहरण करुन खून केल्या प्रकरणी ...

अनिल पाटीलमुरगूड : सोनाळी ता.कागल येथील वरद रवींद्र पाटील (वय ७) या बालकाचा अपहरण करुन खून केल्या प्रकरणी अटकेत असणारा संशयित आरोपी दत्तात्रय उर्फ मारुती तुकाराम वैद्य (वय ४५ रा सोनाळी ता.कागल) याला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. आज, मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश के. बी. अग्रवाल यांनी ही शिक्षा ठोठावली.१७ ऑगस्ट २०२१ रोजी वरद खून प्रकरण चांगलेच गाजले होते. आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी वरदच्या कुटुंबियांनी आणि सोनाळी व सावर्डे ग्रामस्थांनी विविध मोर्चे आंदोलने केली होती. मुरगूड पोलिसांनी हे प्रकरण संवेदनशील पणे हाताळून आरोपीला तात्काळ अटक केली होती. वरदच्या कुटुंबीयांनी मात्र आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी उचलून धरली होती.अधिक माहिती अशी, सोनाळी येथील वरद पाटील हा आजोबा दत्तात्रय शंकर म्हातूगडे यांच्या घरी वास्तूशांती समारंभासाठी गेला होता. दरम्यान १७ ऑगस्ट २०२१रोजी रात्री आठ पासून तो बेपत्ता होता. रात्रभर घरच्यांनी त्याचा शोध घेतला पण त्याचा शोध न लागल्याने अखेर मुरगूड पोलिस स्टेशनमध्ये अपहरणाची तक्रार दिली. मुरगूड पोलिसांनी दोन दिवसांमध्ये तपासाची चक्रे वेगाने फिरवून काही तासात संशयित म्हणून दत्तात्रय उर्फ मारुती वैद्य याला ताब्यात घेतले होते. वैद्य हा वास्तूशांती समारंभासाठी सावर्डे या गावी गेला होता.त्याला सावर्डे मधील काहींनी वरद बरोबर पाहिले होते. त्यामुळे मुरगूड पोलिसांचा संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच आपण वरदचे अपहरण केले असून त्याचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली होती. या गुन्ह्याचा तपास मुरगूडचे तत्कालीन सहा पोलीस निरीक्षक विकास बडवे, सहा पोलीस उप निरीक्षक किशोरकुमार खाडे, सहा पोलीस उप निरीक्षक कुमार ढेरे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. सरकारतर्फे या खटल्यात प्रधान जिल्हा सरकार वकील विवेक शुक्ल , विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी काम पाहिले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय