शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालये महत्त्वाची

By admin | Updated: July 16, 2015 20:52 IST

देवानंद शिंदे : साहित्यिकांना इंदिरा संत साहित्य कृती पुरस्कार

इचलकरंजी : सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालयांची भूमिका महत्त्वाची असून, साहित्यिकांच्या वाड्मयाने समृद्ध असलेली वाचनालये ही ज्ञानाची मंदिरे आहेत. माणसाच्या वेदना, दु:खे आणि घुसमट साहित्यातून प्रकट झाली तर परिस्थिती बदलण्यासाठी त्याचा निश्चितपणे उपयोग होईल, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केले.येथील आपटे वाचन मंदिर व मराठी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टच्यावतीने आयोजित इंदिरा संत साहित्य कृती पुरस्कार सोहळ्यामध्ये डॉ. शिंदे बोलत होते. साहित्यिक डॉ. राजन गवस म्हणाले, साहित्याचा अंतिम हेतू लोककल्याणाचा आहे. मात्र, सध्याच्या साहित्याला राजकीय व सामाजिक वातावरण काही प्रमाणात अडसर ठरत आहे.राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात श्रीधर नांदेडकर (उत्कृष्ट काव्यसंग्रह), भानू काळे (उत्कृष्ट गद्य साहित्यकृती), भारत सासणे (कथासंग्रह), कृष्णात खोत (कादंबरी), मिलिंद चंपानेरकर-पुष्पा भावे (अनुवाद), म. वि. कोल्हटकर (बाल साहित्यकृती), राजीव नाईक (नाट्यसाहित्य कृती), योगेश सोमण (एकांकिका), भूषण कोरगावकर (ललित गद्य), वीरा राठोड व नीलम माणगावे (लक्षणीय काव्यसंग्रह), डॉ. दाऊद दळवी व मृणालिनी चितळे (लक्षणीय गद्य साहित्यकृती), तसेच स्थानिक साहित्यिक म्हणून रामचंद्र ढेरे आणि उत्कृष्ट वाचक यासाठी सुभाष मुनगेकर यांना सन्मानित केले.यावेळी नवोदित लेखक प्रसाद ताम्हनकर यांच्या ‘जांभूळ पट्टी’ पुस्तकाचे राजन गवस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. काव्य व गद्य साहित्यकृती परीक्षण केल्याबद्दल किरण पाटील, बळवंत जेऊरकर व रणधीर शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. अ‍ॅड. स्वानंद कुलकर्णी व डॉ. विलास शहा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, डॉ. महेश काकडे, अशोक सौंदत्तीकर, डॉ. सपना आवाडे, प्राचार्य डॉ. पी. आर. कडोले, प्रा. अशोक दास उपस्थित होते. (प्रतिनिधी)