कागलचा कोंढाणा परत खेचून आणूया : समरजित घाटगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST2021-02-05T06:59:07+5:302021-02-05T06:59:07+5:30

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या तसेच गटातर्फे निवडणूक लढलेल्या उमेदवारांचा सत्कार समारंभ बुधवारी येथील गहिनीनाथ नगरमधील इंदुमती लाॅनमध्ये ...

Let's pull back Kagal's Kondhana: Samarjit Ghatge | कागलचा कोंढाणा परत खेचून आणूया : समरजित घाटगे

कागलचा कोंढाणा परत खेचून आणूया : समरजित घाटगे

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या तसेच गटातर्फे निवडणूक लढलेल्या उमेदवारांचा सत्कार समारंभ बुधवारी येथील गहिनीनाथ नगरमधील इंदुमती लाॅनमध्ये आयोजित केला होता. तेव्हा ते बोलत होते. जिजाऊ महिला संघटनेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे, अशोक चराटी, बाबासाहेब पाटील, अमरसिंह घोरपडे, विश्वजित पाटील, अनंत फर्नांडिस, बेनिता डायस, भूषण पाटील प्रमुख उपस्थित होते.

घाटगे म्हणाले की, आमच्या शिवार संवाद उपक्रमाची थट्टा केली जात आहे; पण शेतकरी कर्जमाफी, वीज बिल याबद्दल बोलत नाहीत. गाड्या न पाठवता अशी गर्दी जमवून दाखवावी. अशोक चराटी म्हणाले की, आजरा नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाआघाडी होण्यापूर्वीच हे माझ्याविरोधात एकत्र आले होते. जनतेने नाकारले; म्हणून चिंता करण्याची गरज नाही. यावेळी बाबासाहेब पाटील, राजेंद्र जाधव, राजेंद्र तारळे, अजित जमादार यांची भाषणे झाली. युवराज पाटील यांनी स्वागत, तर करणसिंह घाटगे यांनी आभार मानले.

चौकट.

● मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष

हे सरकार मराठा आरक्षणाबद्दल गंभीर नाही. ‘सारथी’ संस्था टिकावी म्हणून छत्रपती संभाजीराजेंना चकरा मारायला लागल्या आहेत. आरक्षणाच्या तारखेला वकील हजर राहत नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षणासाठी योग्य व ठोस प्रयत्न केले; पण त्यांच्यावरच जास्त टीकाटिप्पणी केली. आता ते सर्वजण गप्प आहेत, असे समरजित घाटगे यांनी सांगितले.

फोटो कॅप्शन

कागल येथे भाजपच्या नूतन ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभात जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Let's pull back Kagal's Kondhana: Samarjit Ghatge