शासनाच्या नियमांचे पालन करून सण साजरे करूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:26 IST2021-09-03T04:26:13+5:302021-09-03T04:26:13+5:30

पोलीस निरीक्षक अरविंद काळे : घोटवडे येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार लोकमत न्यूज नेटवर्क करंजफेण : गणेश उत्सव काळात ...

Let's celebrate the festival by following the rules of the government | शासनाच्या नियमांचे पालन करून सण साजरे करूया

शासनाच्या नियमांचे पालन करून सण साजरे करूया

पोलीस निरीक्षक अरविंद काळे : घोटवडे येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

करंजफेण : गणेश उत्सव काळात शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून पोलीस प्रशासन व ग्राम प्रशासनाला सहकार्य करून सर्वांच्या श्रद्धेचा असलेला गणेश उत्सव सण साजरा करावा. कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची काळजी घेऊन प्रशासनाला त्रास होणार नाही याची प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी, अशी विनंती पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी केली. घोटवडे (ता.पन्हाळा) येथे कोरोना काळात व महापुराच्या आपत्ती काळात जिवाची पर्वा न करता देश सेवेच्या हिताने पुढे सरसावलेल्या योद्ध्यांचा प्रशिस्तपत्र देऊन काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन पोलीसपाटील विजया कुंभार यांनी केले होते.

यावेळी सरपंच रजनी पाटील, उपसरपंच माया लव्हटे, पोलीसपाटील विजया कुंभार, दगडू पाटील, धोंडिराम कुंभार, संदीप गाडगीळ, रवींद्र कांबळे, आरोग्यसेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.

०२ फोटो

Web Title: Let's celebrate the festival by following the rules of the government