शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

झाडांचे संवर्धन करुन शहर हरित करुया: जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 3:55 PM

जैवविविधता आणि झाडांचे संवर्धन करुन शहर स्वछ, सुंदर आणि हरित करुया. यासाठी लोकसहभाग आणि गार्डन्स क्लबच्या माध्यमातून प्रयत्नांची गरज आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी येथे केले.

ठळक मुद्देगार्डन्स क्लबच्या पुष्पप्रदर्शनाला सुरुवात पहिल्या दिवशी गर्दी : विविध फुलांचा समावेश

कोल्हापूर : जैवविविधता आणि झाडांचे संवर्धन करुन शहर स्वछ, सुंदर आणि हरित करुया. यासाठी लोकसहभाग आणि गार्डन्स क्लबच्या माध्यमातून प्रयत्नांची गरज आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी येथे केले.महाविर उद्यान येथे गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४९व्या पुष्पप्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती महापौर अ‍ॅड. सुरमंजिरी लाटकर, नगरसेवक राहुल चव्हाण, उमा इंगळे, स्मिता कदम, गार्डन्स क्लबच्या अध्यक्ष कल्पना सावंत, उपाध्यक्ष शशिकांत कदम, सचिव पल्लवी कुलकर्णी, राज अथणे, प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड,‘आयआयआयडी’ चे अध्यक्ष संदीप घोरपडे आदी प्रमुख उपस्थिती होती.या प्रदर्शनात डेलिया, मिनिमेअर डेलिया,ग्लॅडिाओली, झिनियार, अस्टर, कर्दळ, जर्बेरा, झेंडू, सुर्यफूल, गुलाब, निशिगंध, डेझी, जास्वंद यासह विविध जातीच्या फुलांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्याचबरोबर पुष्परचेच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.यावेळी ‘किंग आॅफ द शो’ अण्णाभाऊ साठे सूत गिरणी (आजरा) व ‘क्वीन आॅफ द शो’ संजय घोडवत ग्रुप (अतिग्रे)यांना प्रदान करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. तसेच गार्डन्स क्लब च्या रोजेट या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, जैवविविधतेने नटलेल्या कोल्हापूरात झाडांचे आणखी संवर्धन करुया. त्यामुळे कोल्हापूरकडे पर्यटकांची रीघ लागेल.डॉ. कलशेट्टी म्हणाले, पुष्पप्रदर्शन हे फक्त महावीर उद्यानापुरते न राहता शहरातील प्रत्येक उद्यानात भरवले पाहिजे. तरच लोकांना पर्यावरणाचे महत्त्व समजेल. कल्पना सावंत म्हणाल्या, तीन दिवस हे प्रदर्शन सुरु राहणार असून यामध्ये पर्यावरण विषयक कार्यशाळा, प्रात्यक्षिके, घरगुती बाग-बगीचा, किचन कंपोस्ट, पर्यावरणपूरक निवारा, विविध स्पर्धा, सजावट स्पर्धा अशा विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे.

प्रदर्शनात विविध कार्यक्रमप्रदर्शनात लहान मुले व जेष्ठांसाठी चित्रकला स्पर्धा, पर्यावरण विषयक लघुपट स्पर्धा, बोटानिक फॅशन शो असे कार्यक्रम होणार आहेत. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सोमवरी सायंकाळी ६ वाजता प्रमुख पाहुण्या शांतीदेवी.डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर