शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

कोल्हापुरात महिलांसह तरुणांनी गिरविले कोल्हापुरी फेटा बांधणीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:07 AM

कोल्हापुरी फेटा डोक्यावर स्वत:च्या हातांनी आपल्या आणि इतरांच्या डोक्यावर बांधायचा कसा, याचे धडे शाहू स्मारक भवनच्या प्रांगणात  आबालवृद्ध, युवक, युवतींनी गिरविले.

ठळक मुद्देकोल्हापुरी फेटा बांधणी प्रात्यक्षिक सरसर वळणारी बोटे आणि फेटयाचा तुरा

कोल्हापूर : कोल्हापुरी फेटा डोक्यावर स्वत:च्या हातांनी आपल्या आणि इतरांच्या डोक्यावर बांधायचा कसा, याचे धडे शाहू स्मारक भवनच्या प्रांगणात  आबालवृद्ध, युवक, युवतींनी गिरविले.

फेटा बांधत असताना पाहण्याची उत्सुकता, सरसर वळणारी बोटे, फेट्याची घडी करून त्याचा तुरा खोवल्यानंतर डोक्यावर डौलाने, ऐटबाजपणे विराजमान झालेला फेटा पाहून कला अवगत झाल्याचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहू लागला. अवघ्या एका मिनिटात बांधला जाणारा फेटा डोक्यावर रुबाबदार दिसतो; पण या एका मिनिटाच्या मागे किती कष्ट असतात, याची अनुभूतीही उपस्थितांनी घेतली.मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोल्हापुरी फेटा बांधण्याची कला जोपासली जावी, या हेतूने फेटा बांधणी प्रात्यक्षिक शिबिर घेण्यात आले.

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली खुपिरेचे अप्पासो रेवडे व शिंदेवाडीचे मिलिंद चव्हाण, अवधूत पाटील यांनी फेटा बांधायचा कसा याचे धडेच उपस्थितांना दिले. महिला, युवती, युवक, वृद्ध यांनी सोबत आणलेल्या फेट्यापासून कोल्हापुरी फेटा कसा बांधायचा हे समजून घेतले.

स्वत:च स्वत:च्या डोक्यावर बांधण्याबरोबरच इतरांच्या डोक्यावर कसा बांधायचा, गुंडाळी करताना बोटे कशी वळवायची, त्याची घडी कशी करायची, तुरा कसा काढायचा, तो खोवायचा कसा हे शिकून घेतले.

प्राचीन काळापासून शिरस्राण म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे फेटे देशभर बांधले जातात. कोल्हापुरातही सर्वसामान्य जनता फेटे बांधत असते. संस्थानकाळात शाहू महाराजांनी मोठ्या कार्यक्रमातही फेटे बांधायला द्यावेत, अशी इंग्रजांना विनंती केली. ती मान्य झाल्यानंतर कोल्हापुरी फेट्याची ओळख अधिक ठळक होत गेली, अशी आठवण इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी सांगितली.

खुपिरे येथील आप्पासो रेवडे हा युवक गेली १५ वर्षे फेटे बांधतो. आजोबांकडून फेटे बांधायला शिकलेले आप्पा आठवीपासून फेटे बांधतात. बांधणीचा वेग इतका आहे की, फेटा बांधायला एक मिनिटही त्यांना लागत नाही. त्यांना याबद्दल विचारले तर ‘ही एक कला आहे. सराव केला की काहीच अवघड नसते. फक्त एकाग्रता आणि शिकण्याची इच्छा पाहिजे,‘ असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर