शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

कोल्हापुरात पावसाची उघडीप, पंचगंगेची पाणी पातळी ३७ फूट ८ इंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 12:08 IST

पंचगंगा नदीची पाणी पातळी इंचा इंचाने वाढत असल्याने काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर : शहर, जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेल्या सतंतधार पावसाने आज, शुक्रवारी सकाळपासून उघडीप घेतली आहे. मात्र, ढग दाटून येताच अधून-मधून मोठ्या सरी कोसळत आहेत. आज, सकाळी पंचगंगेची पाणी पातळी ३७ फूट ८ इंचावर पोहचली होती. इशारा पातळीवर जाण्यासाठी केवळ दीड फूट शिल्लक असल्याने प्रशासन सतर्क राहून बाधित ठिकाणच्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्याच्या सूचना देत आहे. एकूण ६४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.थांबून थांबून जोरदार सरी कोसळत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. पंचगंगा नदीची पाणी पातळी इंचा इंचाने वाढत असल्याने काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास मध्यरात्री पाणी पातळी इशारा पातळीवर पोहण्याची शक्यता आहे.राधानगरी धरणातून १४०० क्युसेक विसर्गराधानगरी धरणात १५१.४३ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.चोवीस तासातील पाऊसगुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत झालेला तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये असा : हातकणंगले : १४.६, शिरोळ : ८.८, पन्हाळा : ४३.४, शाहूवाडी : ४८.४, राधानगरी : ५१.१, गगनबावडा : ७७.७, करवीर : ३०.२, कागल : २६.३, गडहिंग्लज : १८.९, भुदरगड : ४८.३, आजरा : ३९, चंदगड : ७२.७.हे बंधारे पाण्याखालीपंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील हळदी, सरकारी कोगे, राशिवडे, शिरगाव व तारळे, कासारी नदीवरील वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व बाजारभोगाव, कडवी नदीवरील सवते सावर्डे, शिरगाव, सरुड पाटणे व कोपार्डे, वेदगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे, गारगोटी, शेणगाव व शेळोली, घटप्रभा नदीवरील कानर्डे सावर्डे, हिंडगाव, तारेवाडी व अडकूर, वारणा नदीवरील चिंचोली, माणगाव, कोडोली, तांदूळवाडी, शिगाव, खोची, चावरे व दानोळी, दुधगंगा नदीवरील दत्तवाड, सुळकुड, सिद्धनेर्ली व सुळंबी, कुंभी नदीवरील शेणवडे, कळे, वेतवडे व मांडुकली, तुळशी नदीवरील बीड व आरे, ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी व चंदगड, धामणी नदीवरील सुळे, पणुंद्रे व आंबर्डे, हिरण्यकेशी नदीवरील- निलजी असे बंधारे पाण्याखाली आहेत.पाणी पातळी फुटांमध्ये अशी :राजाराम : ३६.१०, सुर्वे : ३५.१, रुई : ६५, इचलकरंजी : ६०.६, तेरवाड : ५५.३, शिरोळ : ४७.९, नृसिंहवाडी : ४७.६, राजापूर : ३५.९ फूट.धरणातील पाणीसाठा टीएमसीमध्ये असा :राधानगरी : ५.१०, तुळशी : २.०८, वारणा : २१.५४, दूधगंगा : १३.०२, कासारी : १.९७, कडवी : १.६५, कुंभी : १.६४, पाटगाव : २.२१, चिकोत्रा : ०.९४ , चित्री : १.०७, जंगमहट्टी : ०.७९ , घटप्रभा : १.५६, जांबरे : ०.८२, आंबेओहोळ : ०.९९, कोदे :०.२१.

संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने पोलीस विभाग सज्ज आहे. पावसाच्या पाण्याने ओढे, नाले ओसंडून रस्त्यावरून पाणी वाहत आहेत. वाहनधारकांनी पाण्यात वाहने घालू नयेत. गरज भासल्यास पोलीस प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाच्या ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा. धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. - शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदीWaterपाणी