Kolhapur: पन्हाळा तालुक्यातील बांबरवाडीत बिबट्यासह चार बछड्यांचे दर्शन -video

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:19 IST2025-05-29T13:18:22+5:302025-05-29T13:19:09+5:30

पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील बांबरवाडी गावाच्या शेजारील डोंगरात बिबट्यासह चार बछडे आढळले. कुत्र्याच्या भुकण्याने बिबट्यासह एक बछडा ...

Leopard and four cubs sighted in Bambarwadi Panhala taluka Kolhapur | Kolhapur: पन्हाळा तालुक्यातील बांबरवाडीत बिबट्यासह चार बछड्यांचे दर्शन -video

Kolhapur: पन्हाळा तालुक्यातील बांबरवाडीत बिबट्यासह चार बछड्यांचे दर्शन -video

पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील बांबरवाडी गावाच्या शेजारील डोंगरात बिबट्यासह चार बछडे आढळले. कुत्र्याच्या भुकण्याने बिबट्यासह एक बछडा बाजूला गेला, तर तीन बछडे त्याच परिसरात असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. ग्रामपंचायतीने परिसरात बिबट्यासह बछड्याचा वावर असल्याचे सावधानतेचा इशारा दिला आहे.

अधिक माहिती अशी, बांबरवाडी गावाच्या लगत पूर्वेकडील बाजूस असणाऱ्या खडीवर नावाच्या ओसाड डोंगरात बिबट्यासह चार बछड्याचे दर्शन बुधवारी (दि. २८) सायंकाळी झाले. कुत्र्यांच्या जोरजोरात भुंकण्याच्या आवाजाच्या दिशेने ग्रामस्थांनी पाहिले असता बिबट्यासह चार बछडी दिवसाढवळ्या फिरताना दिसली. त्या ठिकाणाहून दुसरीकडे जाताना कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे बिबट्यासह बछड्यांची ताटातूट झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे बिबट्यासह ती बछडी त्याच परिसरात दिवसभर फिरताना दिसत होती.

गावाच्या शेजारी बिबट्यासह बछड्याचे दर्शन झाल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. २७) रात्री ११ च्या सुमारास निकमवाडी येथील गावाशेजारील शेतात संभाजी खोत यांना बिबट्या आढळला.

Web Title: Leopard and four cubs sighted in Bambarwadi Panhala taluka Kolhapur