शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

लोकहिताचा वसा आणि वारसा जपणारे बावनकशी नेतृत्व...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:22 IST

मुरगुडसारख्या ग्रामीण भागात १९६४ मध्ये जन्म झालेल्या प्रा. संजय मंडलिक यांना जन्मापासूनच राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू मिळाले. १९८६ मध्ये ...

मुरगुडसारख्या ग्रामीण भागात १९६४ मध्ये जन्म झालेल्या प्रा. संजय मंडलिक यांना जन्मापासूनच राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू मिळाले. १९८६ मध्ये ते शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या माध्यमातून त्यांची राजकारणाला सुरुवात झाली. महाराष्ट्र प्रदेश एन.एस.यु.आय.मध्ये काम सुरू केले. त्यामुळे विविध नेत्यांशी संपर्क होत गेला. १९९७ मध्ये ते गोकुळ दूध संघाचे संचालक झाले तर याचवर्षी बोरवडे जि. प. मतदारसंघातून निवडून आले तसेच २०१४ मध्ये ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनले. या दोन वर्षांच्या काळात त्यांनी जि.प.चे उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यावेळी ‘पावनखिंड’हे मासिकही सुरू केले.

सर्व पक्षांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची हातोटी वाखणण्याजाेगी आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात या स्वभावाचे प्रत्यंतर आले होते त्याचेच प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आले. सर्वांशी सलोखा राखत त्यांनी लोकसभा निवडणुकीत यश मिळविले. गेल्या १६ वर्षांपासून ते सहकार बोर्डाचे ही अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक तसेच शिवराज शिक्षण संस्थेचे सचिव म्हणूनही कार्यरत आहेत त्यांचे शिक्षण आणि सहकार क्षेत्रात भरीव योगदान आहे. चांगल्या संबंधामुळे ते लोकसभेवर उच्चांकी मताधिक्कयाने निवडून आले.

दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्यानंतर उत्तराधिकारी म्हणून मंडलिक गटाचे नेतृत्व खासदार प्रा.संजय मंडलिक यांनी सक्षमपणे सांभाळले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात मंडलिक नावाचा दबदबा गेल्या पाच पन्नास वर्षांपासून कायम आहे.अशा बावन्नकशी नेतृत्वाला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा...!

............

उठावदार कामगिरी....

कोट्यवधींचा निधी खेचून आणत जिल्ह्यातील वाडयावस्त्या,धनगरवाडे विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न.

गडहिंग्लज, राधानगरीतील विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधीला मंजुरी.

राधानगरी धरणाच्या सुशोभीकरणासाठीही निधी.

कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू करण्याच्या मागणीला पाठबळ.

ईएसआयसी हाॅस्पिटलसाठी निधी.

कागल-सातारा महामार्ग सहापदरीकरण,

इएसआयसी हाॅस्पिटल सुरू होण्यासाठी पाठपुरावा. मतदारसंघातील रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी निधी.

........

संयम व धीरोधात्त अंगभूत गुण ...

राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर नेत्याला कार्यकर्त्यांचे पाठबळ महत्त्वपूर्ण असते त्यामुळे दिवंगत मंडलिकांनी कोणताही राजकीय निर्णय घेताना त्यांच्याशी बोलूनच निर्णय घेतला. त्याच धर्तीवर प्रा मंडलिक यांनी राजकीय रणनीती अवलंबली आहे. वरवर जहाल व्यक्तिमत्त्व वाटत असले तरी प्रा. मंडलिक हे अत्यंत संवेदनशील आणि संयमानेच वाटचाल करताना दिसतात. किंबहुना याचा प्रत्ययच या लोकसभा निवडणुकीत आला.

शब्दांकन : दत्तात्रय पाटील (म्हाकवे)