शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

जिल्ह्यातील नेत्यांनी मैत्री शिकावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:20 IST

कोल्हापूर : निवडणुकीच्या कालावधीत एकमेकाला कितीही शिव्या घालाव्यात; पण त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून चहा पिण्यासाठी एकत्र आले पाहिजे. जिल्ह्यातील राजकारण्यांनी ...

कोल्हापूर : निवडणुकीच्या कालावधीत एकमेकाला कितीही शिव्या घालाव्यात; पण त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून चहा पिण्यासाठी एकत्र आले पाहिजे. जिल्ह्यातील राजकारण्यांनी दोस्ती शिकली पाहिजे, असा सल्ला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. ‘एम. आय. आर. डी.’ संस्थेने जिल्ह्यातील सामाजिक संस्थांचे पालकत्व स्वीकारून काम करावे, लागेल ती मदत देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.महाराष्टÑ इन्स्टिट्यूट आॅफ रिसर्च अ‍ॅँड डेव्हलपमेंट या संस्थेच्या इमारतीचे रविवारी झालेले उद्घाटन व सी. ए. शरद सामंत शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. इमारतीच्या भूमिपूजनवेळचे कर्मचारी लिंगाप्पा भागोजी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, तर मंत्री पाटील यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.मंत्री पाटील म्हणाले, समाजात अनेक संस्था अडचणीतून मार्गक्रमण करत असताना सूर गवसण्यास खूप कालावधी जातो. सामाजिक संस्थांसाठी ‘एमआयआरडी’ने संशोधन करून कशाची गरज आहे, हे शोधून काढा. यासाठी वयोवृद्ध लोकांची नेमणूक करून त्यांचा डाटा तयार करा. सरकार सक्षम आहे, पण सतेज पाटील तसे म्हणणार नाहीत, ते त्यांचे कामच आहे. पण तुमचेच सरकार येणार, असे त्यांनी आपल्या कानात सांगितले, असा चिमटाही त्यांनी काढला.आमदार सतेज पाटील म्हणाले, शरद सामंत यांनी ‘एमआयआरडी’ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम उभे केले. संशोधनासाठी विद्यार्थ्यांना परदेशात जावे लागते, कोल्हापूरच्या स्तरावर संशोधनासाठी यायचे झाले तर ते ‘एमआयआरडी’ मध्येच यायला पाहिजे.संस्थेचे संस्थापक शरद सामंत म्हणाले, अनेक अडथळे पार करत इमारतीचे बांधकाम शासनाने दिलेल्या वेळेपूर्वी पूर्ण केले; पण सामाजिक काम करणाऱ्यांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून वाईट वागणूक मिळते अशी तक्रार मंत्री पाटील यांच्याकडे केली. गिरीष सामंत यांनी स्वागत केले. ‘सायबर’, ‘बालकल्याण’, ‘अवनि’, ‘हेल्पर्स आॅफ हॅँडीकॅप्ड’ या संस्थेस दोन लाख रुपयांची मदत दिली. आमदार सुजित मिणचेकर, संजय पवार, नगरसेवक अर्जुन माने, अजित तारळेकर, संजय व्हनबट्टे, अवधूत झारापकर, पी. डी. देशपांडे, संजय परुळेकर, आदी उपस्थित होते.दुष्काळासाठी स्टँपचा महसूल पुरेसासतेज पाटील यांचे टीका करण्याचे कामच आहे; पण सरकारची निधी देण्यासाठी खूप क्षमता आहे. जीएसटीच्या माध्यमातून उत्पन्न वाढले असून एकट्या स्टॅँपमधून २९ हजार कोटींचे उत्पन्न मिळाले. दुष्काळ निवारण्यासाठी केवळ स्टॅँपचा महसूल पुरेसा असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.दादा, ‘ते’‘ध्यानात ठेवलंय’संघटनेत आता पूर्ण वेळ काम करायचं, हे आमचं ठरलंय. दादा, आता बंटींबद्दल तुम्ही ठरवा असे सांगत, वैयक्तिक काम घेऊन आपल्याकडे यायचे नाही, हे दादांनी सांगितले आहे. पण ‘दादा, आम्ही ते ध्यानात ठेवलंय’, अशी पुष्टी शरद सामंत यांनी जोडल्याने एकच हंशा पिकला.‘सतेज’ यांचं पुढचं काय ठरलंयव्यासपीठावरील उपस्थितांची नावे घेतानाच मंत्री पाटील यांनी ज्यांची ‘आमचं ठरलंय’ ही टॅग लाईन सूचक बोलण्यासाठी वापरली जाते, त्यांचं पुढचं काय ठरलंय हे माहिती नाही, ते आमचे परममित्र सतेज पाटील, असा उल्लेख केला. ‘सतेज’ मंत्री नसले म्हणून ते मदत करण्यास मागे राहणार नाहीत, त्यांच्याकडे क्षमता आहे. परमेश्वर त्यांच्यावर प्रसन्न असल्याने त्यांना राजकारणातूनच गोळा करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले.