शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
5
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
6
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
7
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
8
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
9
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
10
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
11
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
12
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
13
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
14
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
15
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
16
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
17
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
18
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग
19
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
20
Social Viral: बीडच्या ZP शाळेचा पॅटर्न: मधल्या सुट्टीत सुलेखन आणि रंगोळीचे प्रशिक्षण, सरपंचांचेही पाठबळ!

Kolhapur: जिल्हास्तरावर मोठा औषधसाठा, ग्रामीण'ला वेळेत होईना पुरवठा; आरोग्यमंत्र्यांसमोर झालेल्या सादरीकरणामध्ये वस्तुस्थिती स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 13:03 IST

प्राथमिक आरोग्य केंद्रांकडेही लक्ष हवे

कोल्हापूर : अनेकवेळा ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधे अपुरी असल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. यामध्ये तथ्य असल्याचे आरोग्य विभागाच्या कार्यशाळेत सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमक्षच स्पष्ट झाले. त्यातही कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांत जिल्हास्तरावर मोठा औषधसाठा असून, तो वेळेत ग्रामीण रुग्णालयांना पाठवला जात नसल्याचे स्पष्ट झाले.कोल्हापूर जिल्हा शल्य चिकित्सक यांना ६ कोटींचा तर सांगलीसाठी ९ कोटींचा निधी औषधे घेण्यासाठी मंजूर आहे. रत्नागिरीसाठी ८ कोटी ४० लाख, सिंधुदुर्गसाठी ४ कोटी मंजूर आहेत. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अनुक्रमे ७ कोटी, ४ कोटी, साडेसहा कोटी आणि दीड कोटी रुपये मंजूर आहेत.

वाचा - कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एकही प्रसूती नाही; सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये काय स्थिती..  यातील रत्नागिरी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्व औषधे खरेदी केली आहेत तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा प्रस्तावच आरोग्य उपसंचालकांकडे आलेला नाही. कोल्हापूरच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी ५५ लाखांची तर सिंधुदुर्गच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी ४० लाखांची औषध खरेदी केली आहेत. मात्र, जिल्ह्यातील अन्य शासकीय रुग्णालयांना ही औषधे पुरेशा प्रमाणात पाठवली जात नाहीत, असे दिसून येत आहे.

कोल्हापूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडील उपलब्ध औषधसाठा - रुग्णालयांना पाठवण्यात आलेली औषधे

  • टॅब सेफिक्झाईन -२०० एमजी-  ९०,२०० / ३,७६०
  • टॅब सेफ्पॉडॉक्जझाईन १०० एमजी - १,३१,४०० / २०००
  • बी कॅाम्प्लेक्स - ४,८४,५०० / ९४,०९०
  • २ मिलि सिरींज - ३,७१,३५० / १,७८,०५०
  • प्री बायोटिक कॅप्सुल्स - ४५,००० / ००००
  • टॅब कॅल्शिअम विथ व्हिटॅमिन - ४,१९,२०० / ९८,७००

रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडील उपलब्ध औषधसाठा  - रुग्णालयांना पाठवण्यात आलेली औषधे

  • कॅप. डॉक्झिसिलाईन / १,५७,०१० / ३३,७४०
  • (ही आकडेवारी ऑगस्ट २०२५ अखेरची आहे.)

आकडेवारी भरण्याचा कंटाळाऔषधे वेळेत जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांना पुरवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. ई-औषध प्रणाली विकसित करण्यात आली असून, अनेकदा वेळेत पुरवठा झालेला असतो. परंतु, त्याची नोंद न केल्याने या पुरवठ्याचे चुकीचे आकडे दिसत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांकडेही लक्ष हवेअनेकदा प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे याठिकाणी औषधांची टंचाई असल्याच्या तक्रारी असतात. काही ठिकाणी तर ग्रामपंचायतींना त्यांच्या निधीतून औषधांची खरेदी करून द्यावी लागत असल्याची उदाहरणेही समोर आली आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Medicine stock at district level, supply delays to rural areas.

Web Summary : Kolhapur & Ratnagiri have medicine stocks, but rural hospitals face delays. Funds are allocated, but distribution lags. Some health officers haven't even proposed medicine purchases. E-medicine system data entry issues contribute to inaccurate supply figures. Primary health centers also face shortages.