Kolhapur: पन्हाळा रोडवर मोठ्या दगडी शिळा कोसळल्या, वाहतूक बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 13:37 IST2023-10-02T13:36:49+5:302023-10-02T13:37:42+5:30
प्रवाशांसह, पर्यटकांची गैरसोय होणार

Kolhapur: पन्हाळा रोडवर मोठ्या दगडी शिळा कोसळल्या, वाहतूक बंद
नितीन भगवान
पन्हाळा: पन्हाळ्यावर जाणाऱ्या मार्गावर मोठ्या दगडी शिळा कोसळल्या. यामुळे आज, सोमवारी दिवसभर पन्हाळ्यावर येणारी वाहतूक बुधवार पेठेपासुन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांसह, पर्यटकांची गैरसोय होणार आहे.
दरम्यान, नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी तात्पुरत्या रस्त्यावरील दगडी शिळा बाजुला करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी नायब तहसीलदार संजय वळवी, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड उपस्थित असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने सर्वेक्षण केल्यानंतर रस्ता सुरु होणार आहे. दगडी शिळा असणारा भाग वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने त्यांचे सर्वेक्षण होणे आवश्यक असल्याचे नायब तहसीलदार वळवी यांनी सांगितले.