कोल्हापूर: संततधार पावसामुळे पन्हाळा-पावनगड रस्त्यावर भुस्खलन, वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 19:53 IST2022-08-13T19:42:58+5:302022-08-13T19:53:31+5:30
पावनगडावर लोकवस्ती असल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास हा एकमेव मार्ग

कोल्हापूर: संततधार पावसामुळे पन्हाळा-पावनगड रस्त्यावर भुस्खलन, वाहतूक ठप्प
पन्हाळा : पन्हाळा- पावनगडला जोडल्या जाणाऱ्या रस्त्यावर संततधार पावसामुळे भुस्खलन झाले. रस्त्यावर मातीचा भराव कोसळल्यामुळे पन्हाळा - पावनगड वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अजुनही याठिकाणी मोठ्या प्रमाणात माती आणी चिखल येत असलेने परीसर धोकादायक झाला आहे.
पावनगडावर लोकवस्ती असल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास हा एकमेव मार्ग आहे. वनविभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यावर रेडेघाट नर्सरी जवळ भुस्खलन झाल्याने पावनगड नागरिकांना आता पायी चालत जाण्याशिवाय पर्याय नाही. पावसात या रस्त्यावर चिखल होतो. त्यामुळे नागरिकांना कसरत करुन ये-जा करावी लागणार आहे.
प्रशासनाने लवकरात लवकर हा भराव काढून मार्ग खुला केला तरी, धोकादायक व चिखलमय रस्त्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने कायम स्वरुपी तोडगा काढण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.