शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

फेरसुनावणीत अडकले चौपदरीकरणाचे भूसंपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:51 IST

सोलापूर ते रत्नागिरी या नव्या राष्टÑीय महामार्गांतर्गत कोल्हापूर जिल्ह्णातून जाणाऱ्या १३७ कि. मी. लांब मार्गात ४९ गावांचा समावेश आहे; पण या मार्गासाठी सुमारे दीड वर्षानंतर इंचभरही भूसंपादन करण्यात भारतीय राजमार्ग प्राधिकरणास यश आलेले नाही. फक्त नोटिसा, सुनावण्या,

ठळक मुद्दे सोलापूर ते रत्नागिरी नवा मार्ग : दीड वर्ष उलटले; राजमार्ग प्राधिकरणाची कासवगतीने प्रक्रिया; ४९ गावांचा समावेश

तानाजी पोवार ।कोल्हापूर : सोलापूर ते रत्नागिरी या नव्या राष्टÑीय महामार्गांतर्गत कोल्हापूर जिल्ह्णातून जाणाऱ्या १३७ कि. मी. लांब मार्गात ४९ गावांचा समावेश आहे; पण या मार्गासाठी सुमारे दीड वर्षानंतर इंचभरही भूसंपादन करण्यात भारतीय राजमार्ग प्राधिकरणास यश आलेले नाही. फक्त नोटिसा, सुनावण्या, फेरसुनावण्या याच गर्तेत प्रशासकीय यंत्रणा अडकल्याने वर्षअखेरपर्यंतही हे भूसंपादन पूर्ण होण्याची शक्यता दुरापास्त झाली आहे.नागपूर, सोलापूर, कोल्हापूर ते रत्नागिरी असा हा नवा राष्टÑीय महामार्ग क्र. १६६ आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर, मिरज, सांगोला ते सोलापूर अशा सुमारे ३७० किलोमीटर मार्गासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

गेल्या दहा ते बारा वर्षांत कोकणाशी दळणवळण वाढल्याने या नव्या मार्गाची गरज भासू लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्णातील हातकणंगले, करवीर, पन्हाळा आणि शाहूवाडी या चार तालुक्यांतील सुमारे ४९ गावांतून हा मार्ग जातो.या संपूर्ण मार्गाचे चौपदरीकरण व काँक्रीटीकरण होणार आहे. मार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्णातील भूसंपादन प्रक्रियेसाठी १४ फेब्रुवारी २०१८ रोजी अधिसूचना काढली.त्यानंतर प्रक्रिया सुरू झाली; पण प्रारंभीच मार्गावरील मोजणी, क्षेत्र निश्चितीला विलंब झाला. राष्टÑीमहामार्गाची आखणी पूर्ण झाली असताना भूसंपादनासाठी काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे पुढील प्रक्रिया ही कासवगतीने सुरू आहे. खरे तर मार्च २०१८ मध्ये हे भूसंपादन सुरू होणे आवश्यक होते; पण त्यानंतर फक्त प्रक्रिया सुरू असून अद्याप इंचभरही भूसंपादन झालेले नाही. शासनाकडून प्रक्रियेस विलंब होऊ लागल्याने पुढील भूसंपादनाची प्रक्रियाही हळूहळ ू रखडू लागली आहे. सुमारे दीड वर्ष झाले तरीही अद्याप इंचभरही भूसंपादन करण्यात यश मिळालेले नाही. विशेषत: करवीर तालुक्यातील सर्व गावांनी या नव्या मार्गासाठी विरोध दर्शविला आहे.कोल्हापूर जिल्ह्णातून जाणाºया मार्गावरील गावांचा समावेशआंबा, वासल, गोळसवडे, जाधववाडी, चांदोली, तोफेश्वर, हणबरवाडी, भैरेवाडी, भाडळे, मलकापूर, शाहूवाडी, करंजोशी, ठमकेवाडी, गोगवे, बांबवडे, डोणोली, खुटाळवाडी, आवळी, नावली, बोरपाडळे, भांबरवाडी, पैजारवाडी, केर्ले, रजपूतवाडी, कुशिरे, निगवे, भुयेवाडी, भुये, शिये, नंदगाव, हालोंडी, हेर्ले, चोकाक.प्रत्यक्षात क्षेत्र वाढले

प्रारंभी भूसंपादनाच्या नोटिसीवेळी क्षेत्र निश्चित करण्यात आले होते; पण प्रत्यक्ष मोजणीनंतर क्षेत्र आणखी वाढल्याचे निदर्शनास आले; त्यामुळे पुन्हा शेतकºयांना नोटिसा काढल्या व पुन्हा सुनावण्या घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडत आहे.नवीन बायपास मार्ग

केर्ले (शहीद जवान मच्छिंद्र देसाई पेट्रोल पंपानजीक)पासून नवा बायपास महामार्ग आखला असून तो रजपूतवाडी, कुशिरे, निगवे, भुयेवाडी, भुये, शिये, नंदगाव, हालोंडी, हेर्ले, चोकाक असा पुढे कोल्हापूर ते सांगली मार्गाला मिळणार आहे.शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगलेतील सुमारे ५१२ शेतकºयांना भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत भारतीय राज प्राधिकरणामार्फत नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्या सुनावण्या पूर्ण झाल्या असून, काहींच्या फेरसुनावण्या सुरू आहेत. 

कोल्हापूर ते रत्नागिरी या नव्या राष्टÑीय महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असली तरीही सध्या तक्रारदार शेतकºयांच्या फेरसुनावण्या सुरू आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भूधारक शेतकºयांना शासनामार्फत मोबदला दिल्यानंतर भूसंपादन करण्यात येणार आहे.- बी. एस. साळुंखे,  प्रकल्प संचालक, भारतीय राजमार्ग प्राधिकरण

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्ग