शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Jyotiba Chaitra Yatra 2026: जोतिबा यात्रेचा गुलाली रंग..पाऊसधारा झेलत भाविक दंग

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: April 1, 2026 16:21 IST

लाखो भाविकांनी केला चांगभलंचा गजर

कोल्हापूर : महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा बुधवारी जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात होऊन देखील भाविकांची डोंगरावर मोठी गर्दी होती. गगनचुंबी सासनकाठ्यांचा भार खांद्यावर पेलताना हलगीच्या तालावर होणारे लयबद्ध नृत्य, गुलाल खोबऱ्याची उधळण, मानाच्या सासनकाठ्यांचे पूजन, सायंकाळी यमाईचा विवाह, जोतिबा देवाची पालखी.. देवाला सलामी देण्यासाठी वरुणराजाची हजेरी, एकीकडे गडगडाटात कोसळणाऱ्या पाऊसधारा आणि दुसरीकडे भक्तीचा महापूर असा हा अलौकिक सोहळा रंगला. मानाच्या सासनकाठीच्या पूजनानंतर मिरवणुकीला सुरुवात चैत्र पौर्णिमेला दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा भरले. तीन दिवसांच्या या सोहळ्यात आज, बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. दुपारी बारा वाजता पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांच्या हस्ते पाडळी गावच्या पहिल्या व विहेच्या दुसऱ्या क्रमांकाच्या मानाच्या सासनकाठीचे पूजन होऊन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसिलदार माधवी शिंदे आदी उपस्थित होते.रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले दरवर्षीच्या तुलनेत यंदा यात्रेला भाविकांची अलोट गर्दी होती. दुपारी ३ वाजता गडगटासह पाऊसधारा सुरु झाल्या. या पावसाच्या सरी झेलत भाविकांनी यात्रा पार पाडली. सायंकाळी साडे पाच वाजता तोफेच्या सलामीने जोतिबाच्या पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता यमाई मंदिरात यमाईदेवी व जमदग्नी यांचा विवाह सोहळा. त्यानंतर रात्री ८ वाजता जोतिबाची पालखी पुन्हा मंदिराकडे जाते. पालखी सदरेवर विराजमान झाल्यानंतर तोफेच्या सलामीने पालखी सोहळा पूर्ण होतो. आरती, अंगारा वाटप झाल्यानंतर रात्री ११ वाजता देव मूर्तीस शाही स्नान घातले जाते. रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jyotiba Yatra 2026: Rain-Soaked Devotees Celebrate with Fervor

Web Summary : Lakhs thronged Jyotiba for the annual Chaitra Yatra. Despite rain, devotees celebrated with fervor. Festivities included the procession of sacred staffs, the wedding of Yamai, and a palanquin procession, creating a devotional spectacle.