शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यात ऑक्सिजन बेडअभावी मृत्यूचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:24 IST

सदाशिव मोरे आजरा : तालुक्यात १ एप्रिलपासून १,२३३ पॉझिटिव्ह, तर २,३६० निगेटिव्ह रुग्ण आहेत. तालुक्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ४६२ असून, ...

सदाशिव मोरे

आजरा : तालुक्यात १ एप्रिलपासून १,२३३ पॉझिटिव्ह, तर २,३६० निगेटिव्ह रुग्ण आहेत. तालुक्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ४६२ असून, गेल्या ४७ दिवसांत २५ गावांतील ४३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दक्षता न घेणे व अतित्रास सुरू झाल्यानंतर दवाखान्यात दाखल होणे, यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. सध्या तालुक्यात ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचे बेड वाढवण्याची गरज आहे.

तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या व मृत्यूचे वाढलेले प्रमाण पाहता सर्वत्र भितीयुक्त वातावरण आहे.

तालुक्यातील ९४ गावे-वाड्यावस्त्यांपैकी २५ गावांतील ४३ जणांचा झालेला मृत्यू व रुग्णांना ऑक्सिजन बेडसाठी फिरावे लागत असल्याने बहुतांशी नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले आहे.

तालुक्यात उत्तूर ४, कानोली, महागोंड, चव्हाणवाडी प्रत्येकी ३, लाटगाव, भादवण, मडिलगे, वडकशिवाले, बेलेवाडी, सरंबळवाडी, करपेवाडी, आजरा प्रत्येकी २, तर खेडे, पोश्रातवाडी, मेंढोली, पेरणोली, होन्याळी, मासेवाडी, कोवाडे, सुळे, किणे, सरोळी, निंगुडगे, आर्दाळ, उचंगी याठिकाणी प्रत्येकी १, असा ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.

तालुक्यात ३ कोविड सेंटर आहेत. त्यापैकी ५३ बेड ऑक्सिजनचे आहेत, तर १९२ बेड ऑक्सिजन नसलेले आहेत. साळगाव रोडवरील शासकीय कोविड सेंटरमध्ये २० ऑक्सिजन, तर १४० नियमित बेड, मुमेवाडी येथील मुकुंददादा आपटे फाउंडेशन कोविड केअरमध्ये ऑक्सिजन ८, तर २७ नियमित बेड, रोझरी कोविड सेंटरमध्ये २५ ऑक्सिजन, तर २५ नियमित बेड आहेत. तीनही ठिकाणचे ऑक्सिजन बेड फुल आहेत. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजनच्या प्रतीक्षेत फिरावे लागत आहे. रोझरी सेंटरवर ऑक्सिजन बेडसाठी प्रतिदिन ३,७५० रुपये, तर नियमित बेडसाठी २,५०० रुपये द्यावे लागतात. साळगाव रोडवरील कोविड सेंटरमध्ये सध्या औषधे नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे विकत आणावी लागत आहेत.

मुमेवाडी येथील मुकुंददादा आपटे फाउंडेशनने सर्व रुग्णांना मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी जि.प.चे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य उमेश आपटे यांनी सेंटर नागरिकांच्या देणगीतून सुरू केले आहे. याठिकाणी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे.

ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन व

व्हेंटिलेटर बेडची गरज

तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे आजरा ग्रामीण रुग्णालयात ५० बेडचे ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सोय करावी, अशी मागणी होत आहे.