ऊस भरताना ट्राॅलीवरून तोल जाऊन पडल्याने मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:37 IST2020-12-14T04:37:34+5:302020-12-14T04:37:34+5:30

कोल्हापूर : ट्रॉलीमध्ये ऊस भरताना तोल जाऊन जमिनीवर कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या ऊसतोड मजुराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी ...

A laborer dies after falling off a trolley while filling sugarcane | ऊस भरताना ट्राॅलीवरून तोल जाऊन पडल्याने मजुराचा मृत्यू

ऊस भरताना ट्राॅलीवरून तोल जाऊन पडल्याने मजुराचा मृत्यू

कोल्हापूर : ट्रॉलीमध्ये ऊस भरताना तोल जाऊन जमिनीवर कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या ऊसतोड मजुराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी बेडकीहाळ (ता. चिक्कोडी, कर्नाटक) येथे घडली. दया किशन गाडे (वय ३६, रा. कृष्णपूरनगर, औरंगाबाद) असे या ऊसतोड मजुराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दया गाडे हे ऊसतोडणी मजूर गेल्या दोन महिन्यांपासून बेडकीहाळ परिसरात टोळीद्वारे ऊसतोडणीचे काम करीत आहेत. रविवारी सकाळी तोडलेला ऊस ट्रॉलीत भरण्याचे काम सुरू होते. त्यावेळी ट्रॉलीतील भरलेल्या उसावरून तोल जाऊन ते खाली जमिनीवर पडले. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांना बेशुद्धावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.

(तानाजी)

Web Title: A laborer dies after falling off a trolley while filling sugarcane