कुपवाडच्या तरुणाची उदगावमध्ये हत्या; दोघे संशयीत पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 20:12 IST2024-04-11T20:12:21+5:302024-04-11T20:12:31+5:30

पाठलाग करुन दोघा तरुणांनी तरुणाचा खुन केला.

Kupwad youth killed in Udgaon Both suspects are in police custody | कुपवाडच्या तरुणाची उदगावमध्ये हत्या; दोघे संशयीत पोलिसांच्या ताब्यात

कुपवाडच्या तरुणाची उदगावमध्ये हत्या; दोघे संशयीत पोलिसांच्या ताब्यात

जयसिंगपूर: सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील तरुणाचा उदगाव (ता. शिरोळ) येथे भरदिवसा धारदार हत्याराने खुन झाल्याची घटना उघडकीस आली. पाठलाग करुन दोघा तरुणांनी तरुणाचा खुन केला. सचिन चव्हाण (वय २४) असे मृताचे नाव असून निर्भया पथकाच्या सतर्कतेमुळे दोघा संशयीतांना अटक करण्यात आली. सांगली-कोल्हापूर महामार्गावरील खोत पेट्रोलपंपासमोर खुनाची ही घटना घडली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. 

रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला होता. पूर्ववैमनस्यातून हा खुन झाल्याचे समजते. सचिन हा खुनाच्या आरोपाखाली कारागृहात होता. महिनाभरापूर्वी तो जामिनावर सुटून आला होता. गुरुवारी सांगली येथे तो गेला होता. सांगली-कोल्हापूर महामार्गावर उदगाव हद्दीत असणाऱ्या खोत पेट्रोलपंपासमोर पाठलाग करणाऱ्यांनी सचिनला गाठले. यावेळी त्याची मोटारसायकल रस्त्यावर पडली. जीवाच्या भितीने तो शेजारील रस्त्याकडे असणाऱ्या घरात गेला. मात्र संशयीतांनी घरात घुसून संशयीतांनी त्याच्यावर धारदार हत्याराने सपासप वार करुन त्याचा खुन केला. दरम्यान, पेट्रोलिंग करणाºया निर्भया पथकाने संशयीतांना पाठलाग करुन अटक केली.

Web Title: Kupwad youth killed in Udgaon Both suspects are in police custody