कुंभी कारखाना निवडणूक: 'खोट बोल पण रेटून बोल' हाच विरोधकांचा उद्योग - चंद्रदीप नरके
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 18:00 IST2023-02-09T17:22:08+5:302023-02-09T18:00:57+5:30
आमदार पी. एन. पाटलांनी सावध होण्याची गरज

कुंभी कारखाना निवडणूक: 'खोट बोल पण रेटून बोल' हाच विरोधकांचा उद्योग - चंद्रदीप नरके
शिवाजी लोंढे
कसबा बीड : कुंभीवर बोलण्यासारखे काहींच नसल्याने विरोधक बिथरले आहेत. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर टिका करत 'खोट बोल पण रेटून बोल' हा एकमेव उद्योग विरोधक करत असल्याची टीका कुंभी'चे अध्यक्ष, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली. कोगे ता. करवीर येथे नरके पॅनेलच्या सभेत ते बोलत होते, अध्यक्षस्थानी पी. बी. पाटील होते.
यावेळी बोलताना नरके म्हणाले, कोरोना संकटकाळ,केंद्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे साखरेचे दर घसरल्याने साखरधंदा अडचणीत आला असतानाही राज्यात पहिल्या तीन क्रमांकात कुंभीने दर दिला. सहवीज प्रकल्प, डिस्टलरी कप्यासिटी वाढविली. कारखान्याचे क्रसिंग वाढविले, इथेनॉल प्रकल्पही होत आहे, तोडणी कामगार, वाहतुकीची आणि शेतकऱ्यांची बिले वेळेवर दिली.
चालू हंगामामध्ये सात लाख गाळप होऊन सहवीज, डिस्टलरीत फायदाच झाला. कर्जाचे व्याज किंवा हप्ता कधीच थकला नाही. विरोधक कर्जाबाबत चूकीची माहिती पसरवत आहेत, सन २०१७/१८ ला एफआरपी प्रमाणे सर्वच कारखान्यांनी दर घोषित केला. पण फक्त कुंभीनेच १०० चे बील दिले, सभासद शेअर्स व टनेज साखर दिली, पण 'कारंजा का उडत नाही'हेच विरोधकांना दिसते.
पी. एन. पाटलांनी सावध होण्याची गरज
कुंभी परिसरातील जेष्ठ नेत्यांना घरी बसवून एक पॅनेलचे नेते झाले तर दुसरे कुंभी बचाव मंचचे नेते, यांच्यापासून आमदार पी. एन. पाटील यांनीही सावध होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
कुंभीत पुन्हा नरकेच..!
रामकृष्ण पाटील (वरंगेकर) म्हणाले, नरकेंनी कुंभीत कुस्तीला प्राधान्य दिले, परिसरातील मल्ल महाराष्ट्र केसरी पर्यंत पोहोचले, शैक्षणिक प्रगती घडवून कारखाना चांगला चालविला म्हणूनच आमचे नेते बंटी पाटील यांनी यावेळी नरके पॅनेलला पाठबळ दिले आहे. 'आमचं ठरलंय' याप्रमाणे आता 'पक्कं ठरलंय' कुभींत पुन्हा नरकेच..! असे ते म्हणाले.
यावेळी प्रकाश पाटील, बी. बी. पाटील, पुंडलिक पाटील यांची मनोगते झाली. याप्रसंगी भगवान पाटील, रंगराव पाटील, रविंद्र मडके, अनिल पाटील, उत्तम वरूटे, दादासाहेब लाड, सर्जेराव हुजरे, यांच्यासह सभासद ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या. आभार वैभव गुरव यांनी मानले.