शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

कूरच्या शेतकऱ्याचा मुलगा ठरला ‘कुलदीप’

By admin | Updated: July 5, 2015 01:04 IST

सरूडच्या अजित कुंभारचेही यश : ‘यूपीएससी’ परीक्षेत यश : प्रशिक्षण केंद्राचेही दोघे उत्तीर्ण

कोल्हापूर/गारगोटी/सरूड : कूर (ता.भुदरगड) येथील शेतकऱ्याच्या मुलाने तर सरूड (ता. शाहूवाडी) येथील सेवा निवृत्त शिक्षकाच्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अव्दितीय यश मिळवले आहे. कूरच्या कुलदीप शिवाजी कुंभार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) घेतलेल्या परीक्षेत ८६७ वे स्थान पटकावले. तर सरूडच्या अजित बाळासो कुंभार २९२ क्रमांकाने या परीक्षेत यशस्वी झाला आहे. कुलदीप कुंभार यांचे वडील शिवाजी कुंभार हे शेतकरी आहेत. केवळ सव्वा एकर शेती असलेल्या कुंभार कुटुंबीयांनी आपल्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले. कुलदीपने कोल्हापुरातील एस. एम. लोहिया महाविद्यालयातून बारावी विज्ञानपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर रसायनशास्त्र विषयातून बिद्री येथील दूधसाखर महाविद्यालयातून बी. एस्सी ही पदवी संपादन केली. निकाल जाहीर होताच वडील व त्याचा मित्रपरिवारातील सदस्य कुलदीपचे अभिनंदन करण्यासाठी दुपारी पुण्याकडे रवाना झाले. सरूड (ता. शाहूवाडी) येथील अजित कुंभार हा हैद्राबाद येथे भारतीय पोलीस सेवेच्या प्रशिक्षणासाठी आहे. गेल्या वर्षीही त्याने ही परीक्षा ५८८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. गेल्या वर्षी तो आय.पी.एस. झाला होता. प्राथमिक शिक्षण सरूडमध्ये तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सागाव (ता. शिराळा) मध्ये व महाविद्यालयीन शिक्षण कराड येथे झाले आहे. त्याचे वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत, तर आई गृहिणी आहे. कोल्हापूर येथील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातील राहुल काशीनाथ कर्डिले आणि प्रशांत बाळासाहेब गांधले यांनी अनुक्रमे ४२२ व ७८१ वे स्थान पटकावले. राहुल कर्डिले हे सध्या दुय्यम उपनिबंधक - वर्ग १ या पदावर कार्यरत आहेत; तर प्रशांत बाळासाहेब गांधले हे गटविकास अधिकारी वर्ग - २ या पदावर कार्यरत आहेत.