शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

आठवी शिष्यवृत्तीत मुदाळची सई पाटील राज्यात पहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 11:14 AM

Scholarship, kolhapur, Education Sector आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ग्रामीण विभागातून मुदाळ येथील प. बा. पाटील माध्यमिक शाळेची विद्यार्थीनी सई आनंदराव पाटील ही ९५.५९ टक्के गुण मिळवून राज्यात पहिली आली. याच शाळेच्या स्वाती अर्जुन खाडे ९५.२३ टक्के मिळवून द्वितीय तर मैथिली कृष्णात भारमल ९३.८७ टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक पटकावला.

ठळक मुद्देआठवी शिष्यवृत्तीत मुदाळची सई पाटील राज्यात पहिलीपाचवीमध्ये संचिता बलुगडे राज्यात दुसरी, कोल्हापूर जिल्हा पुन्हा अव्वल

कोल्हापूर : आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ग्रामीण विभागातून मुदाळ येथील प. बा. पाटील माध्यमिक शाळेची विद्यार्थीनी सई आनंदराव पाटील ही ९५.५९ टक्के गुण मिळवून राज्यात पहिली आली. याच शाळेच्या स्वाती अर्जुन खाडे ९५.२३ टक्के मिळवून द्वितीय तर मैथिली कृष्णात भारमल ९३.८७ टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक पटकावला.

चौथीच्या परीक्षेमध्ये विद्यामंदिर बोरवडेची संचिता सर्जेराव बलुगडे ९६.५२ टक्के हिने द्वितीय तर विद्यामंदिर आमजाई व्हरवडेचा अविष्कार सुभाष पाटील ९५.८३ टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापूर जिल्ह्याने ही यशाची परंपरा कायम ठेवली असून पाचवीतील १०५ पैकी ३० तर आठवीतील ११० पैकी ३४ शिष्यवृत्ती कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मिळवल्या आहेत.

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण अशा ९५ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. कोल्हापूर जिल्ह्याने ३०.९० टक्के शिष्यवृत्ती मिळवल्या असून त्याखालोखाल पुणे जिल्ह्याने २४ शिष्यवृत्ती मिळवल्या आहेत. त्याखालोखाल सांगली आणि सातारा जिल्ह्याने शिष्यवृत्ती मिळवल्या आहेत. चौथीच्या परीक्षेत केवळ १३ जिल्ह्यातील विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून २२ जिल्ह्यातील एकही विद्यार्थी या यादीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आठवीच्या परीक्षेत ३५ पैकी केवळ १० जिल्ह्यांना यश मिळाले आहे.

जादा तास, पदरमोड

कोल्हापूर जिल्ह्याला हे यश गेली अनेक वर्षे मिळत असून यासाठी शिक्षकांचे योगदान मोठे आहे. जादा तास घेणे, पदरमोड करून १०० पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तयार करणे, झेरॉक्स काढणे, परीक्षेला अन्यत्र घेवून जाणे ही सर्व जबाबदारी शिक्षक घेत आले आहेत. त्यामुळेच शिष्यवृत्ती निकालामध्ये महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्याचा दबदबा निर्माण झाला आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मी अभिनंदन करतो.-प्रवीण यादव, शिक्षण सभापती जिल्हा परिषद कोल्हापूर

चौथा : सिद्धी चौगुले, रमजानशेठ बाणदार विद्यालय,पाचवा : समीक्षा चव्हाण, वि. मं. आमजाई व्हरवडे; अंजली बोरनाक, वि. मं. बामणे; कस्तुरी तुरंबेकर, आदर्श वि. मं. भादवण.सातवा : पायल दावरे, कन्या वि. मं. रांगोळी; श्रुती माने, कन्या वि. मं. उत्तूर; तनिष्का भालेकर, पाचवडे; तन्मयराजे पाटील, वि. मं. टिक्केवाडी; अनुष्का पाटील, प. बा. पाटील विद्यालय.नववा : आदर्श पाटील, वि. मं. सावर्डे; आर्या चौगले, वि. मं. खामकरवाडी; ऋतुजा गोटे, प. बा. पाटील विद्यालय; प्रतीक्षा सूर्यवंशी, वि. मं. सुलगाव; स्वरूप मोहिते, वि. मं. सोनाळी; निर्भय वसावे, संजय गांधी विद्यालय, नागनवाडी.दहावा : प्राजक्ता पाटील, वि. मं. सावर्डे; रिया पाटील, वि. मं. बसरेवाडी; अवनीश माने वि.मं. परिते नं. १; संस्कृत पाटील, वि. मं. सोनाळी; शर्वाणी पाटील, महात्मा फुले विद्यालय; रोहित पाटील, संजय गांधी विद्यालय, नागनवाडी; निरूपम कुरुणकर, वि. मं. जख्खेवाडी; श्रुतिका चौगले, वि.मं. सावर्डे पाटणकर; मोहमद शिकलगार, वि. मं. बारडवाडी; अक्षरा हातकर, वि. मं. बेलवळे बु.; मानसी गुरव, संजय गांधी विद्यालय नागनवाडी; पार्थ कासार, जवाहर बालभवन गारगोटी; सुशांत नार्वेकर, मराठी वि. मं. आसगोली.आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील राज्य गुणवत्ता यादीतील यशस्वी विद्यार्थीपाचवा : देवराज चिंदगे, प. बा. पाटील विद्यालय; अपूर्वा भिउंगडे, प.बा. पाटील विद्यालय.आठवा : सिद्धेश माने, शामराव महाराज हायस्कूल, माजगाव; सुनयन फडके, संजय गांधी विद्यालय, नागनवाडी; रोहन पाटील, शिवाजीराव खोराटे हायस्कूल, सरवडे.नववा : अवंतिका चव्हाण, गणपतराव डोंगळे हायस्कूल, हर्षवर्धन आगम, जवाहर हायस्कूल निळपण.दहावा : जान्हवी पाटील, किसनराव मोरे हायस्कूल, सरवडे; सिद्धेश मुसळे, माध्यमिक विद्यालय, पनोरी.अकरावा : प्रज्ञा पाटील प. बा. पाटील विद्यालय, मुदाळ; साक्षी पाटील, संजय गांधी विद्यालय, नागनवाडी; स्वप्निल जाधव प. बा. पाटील विद्यालय; श्रुतिका साबळे, वारके विद्यालय, तुरंबे; गायत्री ढवण, राधानगरी विद्यालय; श्रावणकुमार देशमाने, उत्तूर विद्यालय; अश्विनी पाटील, प. बा. पाटील विद्यालय.बारावा : दिगंबर पाटील, किसनराव मोरे हायस्कूल, सरवडे.चौदावा : प्रज्ञा पाटील, प. बा. पाटील विद्यालय; श्रीयोग पाटील, पाराशर हायस्कूल, पारगाव; प्रणव पाटील, गर्ल्स हायस्कूल, देवाळे; शर्वाणी देसाई, प. बा. पाटील, विद्यालय.पंधरावा : प्रभा जाधव, गर्ल्स हायस्कूल देवाळे; स्नेहल वारके, प. बा. पाटील विद्यालय; सुशांत चौगुले, प. बा. पाटील विद्यालय; अभिलाषा पाटील, नामदेवराव भोईटे विद्यालय, कसबा वाळवे; प्रणाली सातवेकर, वि. मं. अर्जुनवाडा; सिद्धी पाटील, प. बा. पाटील विद्यालय; समृद्धी फराकटे, मारुतीराव वारके विद्यालय तुरंबे; आसावरी पाटील, नामदेवराव भोईटे विद्यालय, कसबा वाळवे; श्रेयस शिंदे, प. बा. पाटील विद्यालय; सृजन पोवार, शाहू कुमार भवन, गारगोटी.

मुदाळ येथील श्री. प. बा. पाटील विद्यालयाने उमटवली छाप शिष्यवृत्ती परीक्षेच्या पाचवी आणि आठवीच्या निकालावर मुदाळ येथील श्री. प. बा. पाटील माध्यमिक विद्यालयाने आपली छाप उमटवली आहे. माजी आमदार के. पी. पाटील यांनी आपल्या वडिलांच्या नावाने ही शाळा स्थापन केली आहे. आठवीला राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर १४ आणि ग्रामीण विभागामध्ये ३२ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. पाचवीमध्ये राज्यस्तरावर आणि ग्रामीण विभागामध्ये ९ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. पाटील यांचे दोन्ही चिरंजीव या शाळेचे कामकाज पाहतात. ग्रामीण भागातील शाळेने मिळविलेल्या या यशाबद्दल विद्यार्थी आणि शिक्षक यांचे अभिनंदन होत आहे.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीkolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्र