लकी नंबरसाठी कोल्हापूरकरांनी मोजले साडेचार कोटी, सर्वाधिक पसंदी कोणत्या नंबरला.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 15:45 IST2024-09-09T15:45:26+5:302024-09-09T15:45:44+5:30
कोल्हापूर : आपल्या वाहनाची वेगळी ओळख असावी. वाहनाच्या क्रमांकावरून व्यक्ती ओळखली जावी, अशी हौस कोल्हापूरकरांची आहे. हौसेला मोल नाही, ...

लकी नंबरसाठी कोल्हापूरकरांनी मोजले साडेचार कोटी, सर्वाधिक पसंदी कोणत्या नंबरला.. वाचा
कोल्हापूर : आपल्या वाहनाची वेगळी ओळख असावी. वाहनाच्या क्रमांकावरून व्यक्ती ओळखली जावी, अशी हौस कोल्हापूरकरांची आहे. हौसेला मोल नाही, असे म्हटले जाते. फॅन्सी क्रमांक मिळविण्यासाठी गेल्या पाच महिन्यांत कोल्हापूरकरांनी ४ कोटी ६४ लाख ८९ हजार ५०० रुपये प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे भरले आहेत.
नंबरजी बेरीज ९ आणि ९९९९, ०००९, ००९९ आणि क्रमांक १ मिळविण्यासाठी हौशी कोल्हापूरकरांनी पैसे मोजले आहेत. गेल्या सहा महिन्यांत ६३६० जणांनी फॅन्सी क्रमांक घेतले आहेत.
फॅन्सी क्रमांक घेण्यात काही राजकारणी, उद्योजक, व्यावसायिक आणि कार्यकर्तेही आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयात हे क्रमांक मिळत होते. सध्या वाहन विक्री करणाऱ्यांकडेही शुल्क भरून हे क्रमांक मिळतात. एकाच क्रमांकाला अधिक मागणी असेल तर तेथे बोली लावली जाते. ठरावीक क्रमांकाचे शुल्क आरटीओने ठरवून दिली असले तरी तीन लाखांपर्यंतचे शुल्क भरून पसंतीचे क्रमांक घेतले जात आहेत. काही वेळेला दुचाकीचा क्रमांक चारचाकीला घेण्यासाठी जादा रक्कम घेतली जाते.
फॅन्सी नंबरमधून सहा महिन्यांत कोट्यवधींची कमाई
फॅन्सी क्रमांकातून आरटीओला सहा महिन्यांत ४ कोटी, ६४ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा महसूल जमा झाला. या क्रमांकातून वर्षाला सरासरी सुमारे १३ कोटींचा महसूल जमा होता. फॅन्सीसाठी सातत्याने मागणी वाढत आहे.
५० ते १ लाखाचे चॉइस नंबर
५० ते १ लाख शुल्काच्या चॉइस नंबरसाठी ८ जणांनी पैसे भरले आहेत. त्यातून आरटीओला ५ लाख ६० हजार रुपये रुपये मिळाले आहेत.
सर्वाधिक पसंदी ००१ ला
सर्वाधिक पसंती क्रमांक ००१ ला आहे. त्यासाठी अडीच ते तीन लाख रुपये हौशी वाहनधारकांनी भरले आहे. या क्रमांकासाठी बोली आहे. मात्र ती कितीही रक्कमेची असली तरी हौसेला मोल नाही.
पसंती क्रमांकातून कार्यालयाला महसूल मिळत आहे. काही वाहनधारकांची लकी नंबरसाठी सातत्याने मागणी आहे. त्यांना नियमानुसार शुल्क आकारून संबंधित क्रमांक दिला जातो. -विजय इंगवले, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी