शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

कोल्हापूरकरांच्या वाहनहौसेला ब्रेक, विक्रीत घट; बीएस ६, मंदीचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 4:36 PM

: देशात कोणतेही आणि कितीही मोठ्या किमतीचे वाहन येऊ दे; ते आपल्या दारात पाहिजेच, असा अट्टहास बाळगणाऱ्या कोल्हापूरकरांनी यंदा वाहन खरेदीच्या हौसेला आवर घातल्याचे चित्र आहे. विशेषत: जागतिक बाजारपेठेतील मंदी, पश्चिम महाराष्ट्राला बसलेला पुराचा फटका आणि प्रदूषण नियंत्रणासाठी वाहनांमध्ये येऊ घातलेली बी. एस. ६ मानांकन प्रणालीचे इंजिन हे घटक कारणीभूत ठरल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरकरांच्या वाहनहौसेला ब्रेकविक्रीत ४० टक्क्यांहून अधिक घट; बीएस ६, मंदीचा परिणाम

सचिन भोसले कोल्हापूर : देशात कोणतेही आणि कितीही मोठ्या किमतीचे वाहन येऊ दे; ते आपल्या दारात पाहिजेच, असा अट्टहास बाळगणाऱ्या कोल्हापूरकरांनी यंदा वाहन खरेदीच्या हौसेला आवर घातल्याचे चित्र आहे. विशेषत: जागतिक बाजारपेठेतील मंदी, पश्चिम महाराष्ट्राला बसलेला पुराचा फटका आणि प्रदूषण नियंत्रणासाठी वाहनांमध्ये येऊ घातलेली बी. एस. ६ मानांकन प्रणालीचे इंजिन हे घटक कारणीभूत ठरल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे.एकेकाळी मर्सिडीज, जग्वार, रोव्हर अशा जगविख्यात कंपन्यांची कोट्यवधी किमतीची वाहने देशाच्या बाजारपेठेत आल्यानंतर त्यांतील पहिली वाहने कोल्हापूरच्या रस्त्यांवर हमखास दिसणार, अशी ख्याती होती. गेल्या काही वर्षांपासून ऊसदराचा फटका, जागतिकीकरणामुळे आलेली मंदी, आदी कारणांमुळे वाहनेखरेदीचा वेग मंदावला.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ५० टक्क्यांहून अधिक प्रमाणात वाहनविक्रीत घट झाली आहे. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ यादरम्यान एकूण सर्व प्रकारची ८४ हजार ८०२ वाहने रस्त्यांवर आली; तर यंदा आॅक्टोबर २०१९ अखेर ३२ हजार ४१२ वाहने रस्त्यांवर आली आहेत. विशेषत: बीएस फोर ही इंजिन प्रणालीही मागे पडली आहे. त्यामुळे थेट बीएस सिक्स मानांकन असलेली इंजिन प्रणाली प्रत्येक वाहनात येऊ लागली आहे. अशी वाहने नव्या वर्षात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दाखल होतील. त्यानंतर वाहनविक्रीत वाढ होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती, मंदीचे सावट आणि पर्यावरण समतोल राखणारी बीएस सिक्स मानांकनाची इंजिन प्रणाली वाहन व्यवसायात येऊ लागली आहे. त्याचा थेट परिणाम वाहनविक्रीवर झाला असण्याची शक्यता आहे.- डॉ. स्टीव्हन अल्वारिस, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर

दोन वर्षांतील वाहनसंख्यावाहनाचा प्रकार       साल २०१८-१९       साल २०१९-२०२०

  • मोटारसायकल          ४०,८२१             २५,२५६
  • मोटार कार                    ५४३२               ५,०३१
  • टॅक्सी                               -                        ०७
  • लक्झरी टुरिस्ट कॅब          ४८                     ३२
  • आॅटो रिक्षा                   ४९१                    २२०
  • स्टेज कॅरेज                          २२                       -
  • मिनी बस (कंत्राटी)            १०१                   ४४
  • स्कूल बस                              २६                   -
  • खासगी वाहने                         ०६                 ०२
  • रुग्णवाहिका                           ०५                 ०९
  • मल्टी आर्टिक्युलेट वाहने         २६                ०२
  • ट्रक, लॉरी                              ३२४               २२०
  • टँकर                                           -                -
  • डिलिव्हरी व्हॅन    (चारचाकी) १४८०             ५४३
  • डिलिव्हरी व्हॅन (तीनचाकी)   १२६                ८६ 
  • ट्रॅक्टर                                     ७५४              ७४८
  • ट्रेलर                                       ३०३              १३५
  • अन्य वाहने                              १२५                ७७
  • एकूण                                 ५०,०९०            ३२,४१२

 

 

टॅग्स :carकारkolhapurकोल्हापूर