भावा.. हेल्मेटपेक्षा डोस्क लय महाग हाय! पोलिसांनी काठीऐवजी पाटी दाखवल्यावर पठ्ठ्यानं उघडली डिकी, अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 16:59 IST2025-01-21T16:23:22+5:302025-01-21T16:59:07+5:30

कोल्हापूर : प्रवासासाठी 'लाल परी' सर्वात भारी, पण सद्या वाहतुकीची वर्दळ इतकी वाढलीये की, बहुतांश जण प्रवासासाठी दुचाकीला पसंती ...

Kolhapurians follow the traffic rules The traffic police made a special appeal | भावा.. हेल्मेटपेक्षा डोस्क लय महाग हाय! पोलिसांनी काठीऐवजी पाटी दाखवल्यावर पठ्ठ्यानं उघडली डिकी, अन्..

भावा.. हेल्मेटपेक्षा डोस्क लय महाग हाय! पोलिसांनी काठीऐवजी पाटी दाखवल्यावर पठ्ठ्यानं उघडली डिकी, अन्..

कोल्हापूर : प्रवासासाठी 'लाल परी' सर्वात भारी, पण सद्या वाहतुकीची वर्दळ इतकी वाढलीये की, बहुतांश जण प्रवासासाठी दुचाकीला पसंती देतात. वेळेत ऑफिस गाठण्यासाठी दुचाकी काळाची गरज झालीये. यामुळे शहरात ट्रफिकची समस्या  वाढली आहे. कोल्हापूरही त्याला अपवाद नाही.

अशातच चालकांकडून वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अपघातात अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. प्रवासासाठी दुचाकी जितकी महत्त्वाची आहे तितकीच महत्त्वाची आहे आपली सेफ्टी. अन् त्यासाठी दुचाकीला किक मारण्याआधी हेल्मेट घालणं गरजेचे आहे. काही भागात हेल्मट सक्तीचा नियमही आहे. पण यातही लोक युक्ती वापरता अन् हेल्मेट एकतर दुचाकीला अडकवतात नाहीतर ते स्कूटीच्या डिकीत पडून राहते. 

हेल्मेट हाय, पण दुचाकीलाच अडकून फिरणारे आपण बऱ्याच दा बघतो. वाहतूक पोलिस अशा दुचाकीस्वारांवर कारवाई देखील करत असतात. तरी देखील कोल्हापूरकरांच्या वागण्यात काही फरक पडताना दिसत नाही. अखेर कोल्हापुरात आरटीओ अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन कोल्हापुरी भाषेतील फलक हातात घेवून नागरिकांना वाहतुकीचे नियम सांगत जनजागृती केली. यावेळी झाल असं एका दुचाकीस्वाराकडे हेल्मेट नव्हते. अधिकाऱ्यांनी त्या दुचाकीस्वारास विद्यार्थ्यांच्या हातातील फलक दाखवले. यावर लिहिलं होतं भावा.. हेल्मेटपेक्षा डोस्क लय महाग हाय! ही कोल्हापुरी पाठी दाखवताच पठ्ठ्यानं आपल्या स्कूटीची डिकी उघडत हेल्मेट काढले अन् डोक्यात घातलं.

कोल्हापूर आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी वाहतुकीचे नियम पाळण्यासंबंधित जनजागृती मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थी अन् अधिकारी शहरात चौकाचौकात कोल्हापूरी भाषेतील फलक हाती घेवून वाहन चालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करत होते. "हेल्मेट पेक्षा डोस्क लय महाग हाय?"; हेल्मेट फुटलं तर दुसरं घेशील, डोस्क फुटलं तर कुटणं आणणार?" या फलकाबाजीसह हेल्मट वापरा सुरक्षित प्रवास करा, असा संदेश देण्यात आला.

चार चाकी वाहनांसाठी "भावा सीट बेल्ट लाव नाहीतर डायरेक्ट ढगात" अशी फलकबाजी करून नियम समजावण्यात आला. जनजागृतीवेळी काठी अन् दंडात्मक कारवाई न करता हेल्मट घालणाऱ्या आणि सीट बेल्ट वापरणाऱ्यांना गुलाबाचं फूल अन् नियम न पाळणाऱ्यांना पोलिसांकडून झेंडूच फूल देण्यात आलं.

Web Title: Kolhapurians follow the traffic rules The traffic police made a special appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.