कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ६८ पैकी ५८ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक १७ जागा मिळवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पहिल्या स्थानावर आला असून पाठोपाठ कॉंग्रेसचे १४ उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान ५८ पैकी महायुतीला मानणाऱ्या पक्षांचे आणि संघटनांचे ४३ जण निवडून आले आहेत. त्यामुळे महायुती संघटित राहिली तर जिल्हा परिषदेत सत्तांतर होणार असून महायुती सत्तेवर येणार आहे. ही चार वाजल्यापर्यंतची स्थिती असून अजूनही १० जागांचा निकाल बाकी आहे. या निवडणुकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी नियोजनपूर्वक उमेदवार उभे करत सर्वाधिक उमेदवार निवडून आणले आहेत. कधी नव्हे ते त्यांनी जनसुराज्यचे संस्थापक आमदार विनय कोरे यांच्या पन्हाळा, शाहूवाडी मतदारसंघात उमेदवार उभे करत चौघांना निवडून आणले आहे.चंदगडमध्ये भाजपला पाठिंबा दिलेले आमदार शिवाजीराव पाटील यांना राष्ट्रवादी कॉग्रेसकडून धक्का बसला आहे. तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना त्यांच्या मतदारसंघातील राधानगरी तालुक्यात कॉंग्रेसने धक्का दिला आहे.
दुपारी चारपर्यंतचा निकालएकूण जाहीर निकाल ५८
- राष्ट्रवादी कॉंग्रेस १७
- कॉंग्रेस १४
- भाजप ११
- शिंदेसेना ०७
- यड्रावकर शाहू आघाडी ०४
- जनसुराज्य ०३
- उध्दवसेना ०१
- अपक्ष ०१
Web Summary : In Kolhapur ZP polls, NCP secured 17 seats, Congress 14. Mahayuti allies won 43 out of 58 seats declared. Hasan Mushrif strategically won seats even in opposition strongholds. Guardian Minister Abitkar faced defeat in his own constituency.
Web Summary : कोल्हापुर ZP चुनावों में, NCP ने 17 सीटें, कांग्रेस ने 14 सीटें जीतीं। महायुति सहयोगियों ने घोषित 58 में से 43 सीटें जीतीं। हसन मुश्रीफ ने रणनीतिक रूप से विपक्षी गढ़ों में भी सीटें जीतीं। पालक मंत्री आबिटकर को अपने निर्वाचन क्षेत्र में हार का सामना करना पड़ा।