शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur ZP Election Results 2026: नेत्यांच्या पत्नीसह लेकी, सुनांना गुलाल; भरमू पाटील यांच्या सुनेचा मात्र पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:07 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिलांसाठी खुले झाल्याने नेत्यांनी आपल्या पत्नीसह, लेकी, सुना यांना मैदानात उतरवले त्यातील माजी ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिलांसाठी खुले झाल्याने नेत्यांनी आपल्या पत्नीसह, लेकी, सुना यांना मैदानात उतरवले त्यातील माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्या सुनेचा अपवाद वगळता अन्य सर्व उमेदवारांना जनतेने निवडून दिले आहे.१. गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या पत्नी शैलजा पाटील या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून विजयी झाल्या.२. कागल तालुक्यातील बोरवडे मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे यांच्या आई शोभा गणपतराव फराकटे या चुरशीच्या लढतीत विजयी झाल्या. त्या यापूर्वी पंचायत समिती सदस्या होत्या. पक्षाच्या महिला अध्यक्षा शीतल फराकटे यांनी दिलेले सोशल आव्हान त्यांनी गावपातळीवरील वर्चस्वाच्या जीवावर मोडून काढले.३. राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे मतदारसंघातून ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांची कन्या अमृता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून विजयी झाल्या. त्यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत बरेच रणकंदन झाले. परंतु डोंगळे यांनी मुलीला निवडून आणून सार्वजनिक निवडणुकीतील पराभवाचा डाग पुसून काढला. ‘भोगावती’चे संचालक धीरज डोंगळे यांच्या पत्नी भाग्यश्री या काँग्रेसकडून निवडणूक पराभूत झाल्या.

वाचा : अध्यक्षपद राष्ट्रवादीला शक्य; पाटील, फराकटे, डोंगळे चर्चेत४. शाहूवाडी तालुक्यातील पिशवी-बांबवडे मतदारसंघातून राजकुंवर रणवीर गायकवाड या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून विजयी झाल्या. त्या ओबीसी पुरुष गटातून जिंकल्या आहेत. त्यांचे पती रणवीर हे जिल्हा बँकेचे संचालक आहेत. राजकुंवर यांच्या सासू शैलजा गायकवाड या जिल्हा परिषदेत निवडून येऊन सभापती झाल्या होत्या.५. कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली मतदारसंघातून सुयशा अंबरिश घाटगे या भाजपकडून विजयी झाल्या आहेत. त्या महायुतीच्या उमेदवार असल्याने मंत्री हसन मुश्रीफ, समरजित घाटगे यांचीही ताकद त्यांच्यामागे होती. मुळात या मतदार संघात तिन्ही गटांची ताकद चांगली असल्याने आणि अंबरिश घाटगे यांनी पायाला पाने बांधून केलेला प्रचार त्यांच्या विजयास कारणीभूत ठरला.६. भाजपचे इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका कोरोची मतदारसंघातून विजयी झाल्या. त्या आमदार राजेंद्र यड्रावकर यांच्या होणाऱ्या सून आहेत.७. करवीर तालुक्यातील शिंगणापूर संघातून काँग्रेसकडून रसिका अमर पाटील या लोकसंपर्काच्या बळावर दुसऱ्यांदा जिंकल्या. गत निवडणुकीत त्या अपक्ष निवडून आल्यावर त्या शिक्षण सभापती झाल्या होत्या. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या त्या सून आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP Election: Leaders' wives, daughters win; Patil's daughter-in-law loses.

Web Summary : Kolhapur ZP saw leaders' relatives win, except B. Patil's daughter-in-law. Winners include S. Patil, S. Pharakte, A. Dongle, R. Gaikwad, S. Ghatge, S. Awade, and R. Patil.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण