अतुल आंबीइचलकरंजी : कोरोची (ता.हातकणंगले) येथील जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या सानिका राहुल आवाडे यांचा जिल्ह्यात सर्वाधिक ९५०० मताधिक्याने एकतर्फी दणदणीत विजय झाला. सानिका यांच्या निमित्ताने आवाडे घराण्यातील चौथ्या पिढीने राजकारणात यश मिळवले आहे. सानिका या आमदार राहुल आवाडे यांची मुलगी, तर आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर यांच्या सुनबाई आहेत.माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या नगरसेवकपदापासून सुरू झालेल्या राजकीय वाटचालीत त्यांनी नगराध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्रीपदापर्यंत मजल मारली. त्यापाठोपाठ त्यांचे पुत्र प्रकाश आवाडे यांनीही थेट आमदारकीपासून निवडणूक रिंगणात उडी घेतली, तेही एकवेळ मंत्री झाले. तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदही मिळवले होते. त्यानंतर एक वेळ अपक्ष आमदारही झाले. त्यानंतर त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी जिल्हा परिषदपासून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर आमदार झाले आता आवाडे घराण्यातील चौथी पिढी राहुल यांची मुलगी सानिका जिल्हा परिषदेपासून निवडणुकीत उतरल्या. तेथे पहिल्याच प्रयत्नात त्यांना दणदणीत विजय मिळाला. जिल्हा परिषदेसाठी महिला आरक्षण असल्याने तेथे अध्यक्षपदासाठी संधी मिळाल्यास कमी वयातील पहिल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा त्या ठरणार आहेत.
Web Summary : Sanika Awade secured a landslide victory in the Kolhapur Zilla Parishad election with 9500 votes. Representing the Awade family's fourth generation in politics, Sanika, daughter of MLA Rahul Awade and daughter-in-law of MLA Rajendra Patil-Yadravkar, might become the youngest ZP president if given the chance.
Web Summary : सानिका आवाडे ने 9500 वोटों से कोल्हापुर जिला परिषद चुनाव में भारी जीत हासिल की। राजनीति में आवाडे परिवार की चौथी पीढ़ी का प्रतिनिधित्व करते हुए, विधायक राहुल आवाडे की बेटी और विधायक राजेंद्र पाटिल-यड्रावकर की बहू सानिका, मौका मिलने पर सबसे कम उम्र की ZP अध्यक्ष बन सकती हैं।