Kolhapur ZP Election 2026: संजय मंडलिक यांना नव्याने करावी लागणार गटाची बांधणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 18:54 IST2026-02-11T18:53:16+5:302026-02-11T18:54:06+5:30

भविष्यातील राजकीय समीकरणांची उत्सुकता

Kolhapur ZP Election 2026 Sanjay Mandlik will have to rebuild his faction | Kolhapur ZP Election 2026: संजय मंडलिक यांना नव्याने करावी लागणार गटाची बांधणी 

Kolhapur ZP Election 2026: संजय मंडलिक यांना नव्याने करावी लागणार गटाची बांधणी 

जहांगीर शेख

कागल : तालुक्यात मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे एकत्र आल्यानंतर निकाल फार काही वेगळा लागण्याची शक्यता नव्हतीच. स्थानिक परिस्थितीतून पंचायत समितीची एक जागा माजी खासदार संजय मंडलिक यांच्या पदरी पडली. त्यात कोणी नेत्याने आत्मचिंतन करावे, अशीही स्थिती नाही. मात्र, या निकालाने मंत्री मुश्रीफांच्या नेतृत्वाला नवी झळाळी मिळाली. दोन्ही घाटगे एकत्रितपणे सत्तेच्या प्रवाहात आले. या पार्श्वभूमीवर संजय मंडलिक यांना भविष्याच्या राजकारणाचा वेध घेऊन गटाची नव्याने बांधणी व वाटचाल निश्चित करावी लागणार आहे.

या निवडणुकीच्या दरम्यान अनेक प्रमुख कार्यकर्ते मंडलिक गट सोडून गेले आहेत, जे अनेक वर्षे चिवटपणे राजकीय संघर्ष करत होते. या निवडणुकीत अनेक उमेदवार मंडलिकांना आयते मिळाले. त्यांनी मतेही चांगली घेतली. आता गट अथवा पक्ष म्हणून त्यांना आपल्यासोबत कायम ठेवण्याचे आव्हान पेलावे लागेल. आता लोकसभेशिवाय सार्वजनिक निवडणूक नाही. मात्र, ५३ ग्रामपंचायती, जिल्हा बँक, ‘गोकुळ’च्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंडलिकांनी वाटचाल निश्चित करावी लागेल.

मुश्रीफांचा जिल्हाभर डंका 

दोन घाटगेंना एकत्र आणून विजयाचा मार्ग मोकळा केल्यानंतर जिल्हाभर जोडण्या लावण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांना पुरेसा वेळ मिळाला. त्यांनी मुत्सद्देगिरी करत उमेदवार निवडले. जिल्हाभर प्रचारसभा घेत प्रचारात आघाडी घेतली आणि साथीला उमेदवार कार्यकर्ते यांना रसदही पोहोचविली. याचा परिपाक म्हणजे कागल-गडहिंग्लज-उत्तूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाची सत्ता आलीच, पण जिल्ह्यात सर्वांत जास्त जिल्हा परिषदेचे सदस्यही निवडून आले. जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समिती आणि आता जिल्हा परिषदेवर त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला आहे.

राजे गटाला गुलाल लागला 

दोन विधानसभा व गत जिल्हा परिषद - पंचायत समितीच्या निवडणुकीत राजे गटाला पराभवाला सामोरे जावे लागल्याने हे कार्यकर्ते सार्वजनिक निवडणुकीच्या गुलालापासून वंचित होते. अखेर आपल्या गटाला सत्तेत आणण्यात समरजित घाटगे यशस्वी झाले आहेत.

नवीद , अंबरिष यांना उभारी

संजय घाटगे गटाला दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समितीच्या जागा मिळाल्याने अंबरिष घाटगे यांच्या नेतृत्वाला उभारी मिळाली आहे. ‘गोकुळ’चे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी कागल-गडहिंग्लज-,उत्तूर विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत विजयात मोलाची भूमिका बजावली आहे.

Web Title : कोल्हापुर ज़ेडपी चुनाव 2026: संजय मंडलिक को आधार पुन: बनाना होगा

Web Summary : ज़ेडपी चुनाव परिणामों के बाद, संजय मंडलिक को अपना आधार पुन: बनाना होगा। एकीकृत घाटगे और मुश्रीफ को शक्ति मिलती है, जो भविष्य की कोल्हापुर राजनीति को प्रभावित करती है। ध्यान आगामी स्थानीय चुनावों पर केंद्रित है।

Web Title : Kolhapur ZP Election 2026: Mandlik Needs to Rebuild His Base

Web Summary : Following ZP election results, Sanjay Mandlik faces rebuilding his base. Unified Ghatge and Mushrif gain power, impacting future Kolhapur politics. Focus shifts to upcoming local elections.