ZP Election 2026: मतदान स्लीपवरील तारखेमुळे मतदारांत संभ्रम, निवडणूक अधिकारी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:51 IST2026-02-04T13:50:15+5:302026-02-04T13:51:19+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यामुळे दोन दिवस निवडणूक पुढे ढकलण्यात आली

Kolhapur ZP Election 2026 Confusion among voters due to date on voting slip, election officer said | ZP Election 2026: मतदान स्लीपवरील तारखेमुळे मतदारांत संभ्रम, निवडणूक अधिकारी म्हणाले...

संग्रहित छाया

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे मतदान शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी असताना मतदारांना मात्र निवडणूक विभागाकडून आधी छापून घेतलेल्या ५ फेब्रुवारीच्याच स्लीपचे वाटप करण्यात आल्याचे मंगळवारी उघड झाले. काही मतदारांनी या स्लीप ‘लोकमत’कडे पाठवल्या आणि नक्की मतदान कधी आहे हे निवडणूक विभागाला विचारा, असा त्रागा व्यक्त केला.

एकीकडे राज्य निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख बदलली असताना जुन्याच तारखांच्या स्लीपचे वाटत कसे केले जाते, असा सवालही उपस्थित केला जात आहे. निवडणूक शाखेचा हा कारभार मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करणारा आहे.

आधीच्या नियोजनानुसार जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार होते, तर ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार होती. परंतु २८ जानेवारीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यामुळे दोन दिवस निवडणूक पुढे ढकलण्यात आली. नव्या नियोजनानुसार मतदान ७ फेब्रुवारीला, तर ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. परंतु, गावागावांत जुन्याच तारखेच्या स्लीप वाटण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे संभ्रम वाढत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

म्हणे.. पेनने तारीख खोडा..

याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की या स्लीपची आधीच छपाई झाली होती. त्यानंतर अचानक तारखांमध्ये बदल झाला. यातील काही स्लीप या आधीच वाटप करण्यात आल्या होत्या, त्या परत घेणे शक्य नव्हते. ज्या स्लीप वाटायच्या आहेत त्यावर पेनने जुनी तारीख खोडून नवीन तारीख टाकण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.

Web Title : कोल्हापुर ज़ेडपी चुनाव: पर्ची पर गलत तारीख से मतदाताओं में भ्रम

Web Summary : कोल्हापुर जिला परिषद चुनाव में पुरानी तारीख वाली पर्चियां बांटी जा रही हैं, जिससे मतदाताओं में भ्रम है। उपमुख्यमंत्री के निधन के बाद तारीख बदलने के कारण अधिकारियों ने पुरानी तारीख को काटकर नई लिखने का सुझाव दिया है।

Web Title : Kolhapur ZP Election: Conflicting Dates on Slips Cause Confusion Among Voters

Web Summary : Kolhapur voters are confused as old date slips are distributed for the Zilla Parishad election. Due to a date change after the Deputy CM's death, officials suggest crossing out the old date and writing the new one on the slips.