शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही पंधरा महिन्यांचे?,  प्राथमिक चर्चेची उद्या शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 17:04 IST

आता निवडीच्या तारखेची प्रतीक्षा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे महापालिकेप्रमाणेच सव्वा वर्षाचे राहील, असे संकेत मिळत आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांनी ५१ पैकी २० जागा जिंकल्या असल्याने ते पाच वर्षे अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या ताब्यातून सोडण्याची शक्यता नाही, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी हा फॉर्म्युला आणला जाऊ शकतो. जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा आणि महापालिकेत चार नगरसेवकांचे बळ त्यांच्याकडे आहे. जिल्हा परिषदेपेक्षा नगरसेवकांची बार्गेनिंग पॉवर त्यांच्याकडे आली आहे.नूतन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांची नावे बुधवारी राजपत्रात प्रसिद्ध झाली. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेचे मुख्यालय, बाराही तहसीलदार कार्यालये आणि पंचायत समितीच्या कार्यालयांच्या नोटीस बोर्डवरही नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटवरही नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. शुक्रवारी राष्ट्रवादीच्या नूतन सदस्यांच्या सत्कार समारंभात मंत्री हसन मुश्रीफ सत्तास्थापनेबाबत काही सुतोवाच करू शकतील.

वाचा : आम्हाला कुणाच्याही पाठिंब्याची गरज नाही, सतेज पाटलांच्या गुगलीवर मंत्री आबिटकर यांचा टोलाजिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत महायुती जरी स्वतंत्रपणे लढली असली तरी ‘कुस्तीनंतर दोस्ती’ या आधीच्याच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या फॉर्म्युल्यानुसार महायुती म्हणून सर्वजण एकत्र येणार आहेत. त्यामुळे महायुतीची सदस्यसंख्या ५१ वर गेली असून महाविकास आघाडीची संख्या १७ झाली आहे. आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीने पाठिंबा मागितल्यास देऊ, असे सांगून गुगली टाकली आहे.जिल्हा परिषदेच्या सत्तेचा नेमका फॉर्म्युला जरी अजून ठरला नसला तरी संख्याबळानुसार पद वाटप हे धोरण सर्वमान्य असल्याने आता त्यावरूनच नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. मुश्रीफ हे आज गुरुवारी मुंबईहून परतणार आहेत. शुक्रवारी राष्ट्रवादीच्या सदस्यांचा सत्कार असल्याने याचवेळी ते सत्तास्थापनेबाबत काहीतरी भाष्य करतील, अशी अटकळ आहे.

वाचा: मंत्री आबिटकरांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा झेंडा; सतेज पाटील, ए.वाय. यांच्या ताकदीचे यश

महायुतीचे नेते रविवारी भेटणारमहायुतीचे सर्व नेते रविवार, १५ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या विविध समित्यांच्या नाव निश्चितीसाठी एकत्र येणार आहेत. त्याचवेळी जिल्हा परिषदेबाबत प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यावेळी जो फॉर्म्युला ठरेल त्यानुसार पुढची प्रक्रिया पार पडेल. ज्या पक्षाला जे पद येईल त्यानुसार ती नावे संबंधित पक्षाकडून निश्चित केली जातील.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Zilla Parishad president post tenure likely fifteen months: sources.

Web Summary : Kolhapur Zilla Parishad president tenure may be 15 months. With 20 seats, NCP aims to retain control, possibly rotating the position to give more members a chance. Mahayuti's strength is 51. Discussions are expected soon.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMahayutiमहायुती