कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ पाझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 11:33 IST2020-08-18T11:29:40+5:302020-08-18T11:33:28+5:30

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे रॅपिड टेस्टमध्ये कोरोना पाझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वर्तूळात खळबळ उडाली आहे. मित्तल हे रविवारी दीड तास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमत्री सतेज पाटील यांच्यासोबत व्यासपीठावर बसले होते.

Kolhapur Zilla Parishad CEO Positive | कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ पाझिटिव्ह

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ पाझिटिव्ह

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ पाझिटिव्ह जिल्हा परिषदेच्या वर्तूळात खळबळ

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे रॅपिड टेस्टमध्ये कोरोना पाझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वर्तूळात खळबळ उडाली आहे. मित्तल हे रविवारी दीड तास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत व्यासपीठावर बसले होते.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी होत असून याच्या नियोजनासाठी मंगळवारी संध्याकाळी मित्तल यांच्यासमवेत सर्वच पदाधिकारी बसले होते.

या दरम्यान मित्तल यांनी रॅपिड टेस्ट करून घेतली असता त्यांचा अहवाल पाझिटिव्ह आला आहे. त्यांनी डीपीला याबाबतचा संदेश लिहला असून आपल्या संपर्कात आलेल्यांनी योग्य काळजी घ्यावी असे आवाहनदेखील केले आहे. 

Web Title: Kolhapur Zilla Parishad CEO Positive